Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

♦️विजेपासून बचावासाठी वडखळ पोलिस निरीक्षक प्रसाद पांढरे यांचे आवाहन♦️

Responsive Ad Here


✍🏻गडब / अवंतिका म्हात्
            नुकतीच पावसाळ्याला सुरूवात होत असुन सूरू झालेल्या पावसामुळे शेतकरी सुखावला आहे . आणि या शेतकऱ्याने शेतामध्ये जाऊन शेतीची मशागत आणि पेरणीला सुरुवात केली आहे. शेतकरी शेतामध्ये काम करत असताना कोणत्याही प्रकारची जीवित हानी होऊ नये त्याचप्रमाणे वित्त हानी होऊ नये यासाठी पेण तालुक्यातील वडखळ पोलिस ठण्याचे पोलिस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी शेतकऱ्यांसाठी आवाहन केले आहे.
     रायगड जिल्ह्यातील पेण तालुका हे भाताचे कोठार समजले जाते. त्यामुळे पेणमध्ये मोठ्या
प्रमाणावर भातशेती केली जाते. आता पावसाला सुरूवात झाल्याने ही भात पेरणी ची पूर्वतयारी शेतकरी वर्गाने सुरू केली असून पहिल्याच पावसात कोणत्याही प्रकारची जीवित वा वित्त हानी होऊ नये यासाठी वडखळ पोलिस ठाण्याने आवाहन केले आहे.
     पोलिस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी केलेल्या आवाहनानुसार पहिल्याच पावसात ज्यावेळी मोठ्या प्रमाणावर पाउस होतो तेव्हा ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट होत असतो. ही विज पडण्याची प्रक्रिया असते ती उंच ठिकाणी म्हणजेच शेतीशी निगडित शेतातील झाड, विद्युत पोल किंवा विद्युत वाहिन्यांवर विज पडण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे कोणतेही ज्वलनशील पदार्थ जवळ न ठेवता आपत्ती व्यवस्थापनाने जो अॅप तयार केला आहे तो अॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करून ज्यावेळी या अॅप द्वारे विज पडण्याचा संदेश दर्शवला जातो. त्यावेळी ही सर्व खबरदारी घेऊन नंतर मोबाईल बंद करून आपली जीवित हानी आणि वित्त हानी टाळा 

अशी घ्या खबरदारी 


शेतकरी बांधवांनी मुसळधार पाऊस पडत असेल तर  एखाद्या झाडाखाली न राहता शेतामध्ये असणाऱ्या खोपट्यात जमिनीवर न उभे राहता एखादा प्लास्टिक किवा सुक्या लाकडावर दोन्ही पाय जवळ घेऊन मान खाली घालून आणि कानात कापसाचे बोळे भरून डोळे बंद करून राहावे असे आवाहन केले आहे. असे मोलाचे आवाहन वडखळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी शेतकरी वर्गाला केले आहे .