Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

,♦️रेशनकार्ड धारकांना ई-केवायसी अनिवार्य* *♦️बोगस धान्य वितरणाला बसणारा आळा♦️*

Responsive Ad Here




✍🏻गडब / अवंतिका म्हात्र

    शिधापत्रिकेत नावे असलेल्या कुटुंबातील सदस्यांनी ई-केवायसी पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी  असे पुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे. त्यामुळे आता प्रत्येक शिधापत्रिका धारकाला ई - केवायसी करणे बंधनकारक झाले आहे. त्यामुळे स्वस्त धान्य वितरणातील बोगस प्रकरणांना आळा बसणार आहे.
       रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सर्व तालुक्यातील पुरवठा निरीक्षकांना इ- केवायसी संदर्भात नव्याने निर्देश देण्यात आले आहेत. केवायसी पडताळणीची मोहीम तातडीने पूर्ण करावी व त्याचा अहवाल शासनाच्या पोर्टलवर अपलोड करावा, असे जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेश थळे यांनी म्हटले आहे.
     
       एप्रिल २०२४ च्या पत्रांद्वारे केंद्र सरकारने पुरवठा विभागाच्या तहसील स्तरावरील क्षेत्रीय कार्यालयांना कुटुंबनिहाय शिधापत्रिकेतील लाभार्थींची ई केवायसी पडताळणी करण्याचे निर्देश दिले होते. मे अखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र लोकसभा निवडणुकीमुळे हे काम मागे पडले होते. शिधापत्रिकेत नावे असलेल्या प्रत्येक लाभार्थीने आपल्या क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानात जाऊन तेथे उपलब्ध करून दिलेल्या ई पॉस डिजिटल यंत्रामध्ये आधार क्रमांक सिडींग करून घ्यायचा आहे. अवघ्या काही सेकंदाची ही प्रक्रिया असून इ केवायसी पूर्ण झाल्यावरच येत्या काळात लाभार्थीच्या नावाने धान्य वितरणाचा लाभ दिला जाणार आहे. स्थलांतरित कुटुंबांना देखील ते वास्तव्य करत असलेल्या क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानात जाऊन ई केवायसी पडताळणी पूर्ण करता येणार आहे.
असा आहे उद्देशः ई केवायसी अपडेट करण्यामागे धान्य वितरणात पारदर्शकता आणणे हा एकमेव उद्देश आहे. अनेक कुटुंबांमध्ये मयत लाभार्थीच्या नावावर देखील धान्य वितरण केले जाते. संबंधित कुटुंबाकडून याबाबतची माहिती पुरवठा विभागाला दिली जात नाही. नव्या मोहिमेमध्ये प्रत्येक तालुक्यातील मयत लाभार्थी वगळले जातील व धान्य वितरणाचा लाभ इतर वंचित लाभार्थीना मिळू शकेल.
⭕ *स्वस्त धान्य दुकानात ई केवायसी निशुल्क⭕* 

स्वस्त धान्य दुकानातील ४ जीई- पॉस मशीन द्वारे प्रत्येक शिधापत्रिकाधारकाने आपल्या कुटुंबातील सदस्यांची केवायसी करून घ्यावी. केवळ आधार क्रमांक टाकून ही प्रक्रिया पूर्ण केली जाते. ही प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांचे रेशन बंद होऊ शकते. स्वस्त धान्य दुकानात केवायसीसाठी निशुल्क प्रक्रिया आहे. 

     *पेण पुरवठा निरीक्षक अधिकारी श्री सुरेश थळे* 
 धान्य वाटप सुरु होण्या पूर्वी लाभार्थींनी आधार कार्ड सोबत घेऊन रेशन दुकानातून केवायसी पडताळणी करुन घ्यावी. रेशन वाटप सुरू झाल्यावर केवायसी पडताळणीसाठी वेळ लागू शकतो. एकाच वेळी रेशन वाटप आणि केवायसी पडताळणी करणे शक्य होणार नाही.
 रास्तभाव धान्य दुकानदार संघटना अध्यक्ष : यशवंत दळवी