गडब/सुरेश म्हात्रे
⭕देशात स्वच्छ भारत अभियानाचा बोलबाला सुरू असताना पेण तालुक्यातील गडब ग्रामपंचायतींच्या नियोजनामुळे ढिसाळ कचरा प्रश्नाचे तीनतेरा वाजले आहेत. गावातून गोळा केलेला कचरा रहदारीच्या रस्त्यांवर टाकला जात असल्याने रस्ते डम्पिंग पथ बनू लागले आहेत.
मुंबई नजिकच्या पेण तालुक्यातील गडब ग्रामपंचायतींच्या हद्दीतील कचरा रहदारीच्या रस्त्यांवर टाकला जात आहे. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या जनतेचा श्वास कोंडला जात आहे. प्रवाशांना नाक मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. सध्या पेण तालुक्यातील गडब तसेच तालुक्यातील इतर ग्रामपंचायतीमधील नागरिक ओल्या सुक्या कचऱ्याचे नियोजन न करता हा कचरा रस्त्यावर टाकत आहेत. ओला कचरा मोठ्या प्रमाणात कुजत असून, या कचऱ्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. या दुर्गंधीने साथीचे रोग पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
स्वच्छता अभियानाचे गडब ग्रामपंचायतीमधील नागरिक तीनतेरा वाजवीत आहेत. विशेष म्हणजे ग्रामस्वच्छतेसाठी पेण तालुक्यातील महसूल विभाग, पंचायत समिती प्रशासनसुद्धा ग्रामपंचायतींच्या या अस्वच्छ कारभाराला प्रतिबंध करीत नसल्याचे निदर्शनास येत आहे. पेण तालुक्यातील कोणत्याही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ओला कचरा, सुका कचरा वेगळा करावा, शिवाय असलेल्या ओल्या कचऱ्याचे कंपोस्टिंग करावे, अशी जनजागृती करण्यात येत नसल्याचे निदर्शनास येत आहे.
तालुक्यातील ग्रामपंचायतींना
हक्काचे डम्पिंग ग्राउंड नाही.
तालुक्यातील ग्रामीण
भागात
कचऱ्याचे विघटन करता येईल,
अशी सेवादेखील नाही. परिणामी
ग्रामीण भागातील नागरिक
गावातील कचरा रस्त्याच्या कडेला
टाकत आहेत. पेण तहसीलदार आणि पेण पंचायत
समितीचे गटशिक्षणाधिकारी पोल यांनी जनतेच्या
आरोग्याशी निगडित असलेल्या
प्रश्नांकडे दुर्लक्ष न करता
उपाययोजना करण्यासाठी पुढाकार
घ्यावा अशी मागणी जनतेतून
पेण तालुक्यात डम्पिंग ग्राउंडविरहित कचरा व्यवस्थापनाकडे ग्रामपंचायतींची वाटचाल सुरू आहे. त्यामुळे कचऱ्याचे विघटन कसे करावे, ओला कचरा, सुका कचरा वेगळा करावा, ओल्या कचऱ्याचे कंपोस्ट करावे व सुक्या कचऱ्याचे टाकाऊपासून टिकाऊ वस्तू असे प्रयोग करून उरण तालुक्यातील कचऱ्याचे विघटन करावे अशा सूचना ग्रामपंचायतीना देण्यात येत आहेत.
पोल गटविकास अधिकारी, पेण यांना*
*करण्यात येत आहे.*