Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

मतदानाचा टक्का घसरला; गीते, तटकरेंची धाकधूक वाढली; दापोली, गुहागर गेमचेंजर ठरणार?

Responsive Ad Here

●गडब/सुरेश म्हात्रे

 ⬛कोकणात रायगड लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुनील तटकरे व शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गीते यांच्यात प्रमुख लढत होत आहे. तटकरे यांना शेकापचे नसलेले पाठबळ, महाडमधून यंदा काँग्रेसची न मिळालेली साथ तसेच राज्यातील राजकीय भूकंपामुळे राष्ट्रवादीचा सत्तेतील सहभाग, त्यामुळे गद्दारीचा झालेला आरोप यामुळे सुनील तटकरे यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नाही.
गेल्या लोकसभा निवडणुकीप्रमाणेच यावर्षीही मतदानाची टक्केवारी जवळपास कायम राहिली आहे. त्यामुळे सुनील तटकरे यांना रोखण्याचा अनंत गीते यांचा प्लॅन कितपत यशस्वी झाला याबाबत प्रश्नचिन्ह आहे. यावर्षी या लोकसभा मतदारसंघात 60.51% मतदान झाले आहे. 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत 61.77% इतके मतदान झाले होते. त्यामुळे दोन्ही उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.