Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

प्रमुख लढतींकडे लागलेय साऱ्यांचे लक्ष!

Responsive Ad Here
गडब/सुरेश म्हात्रे

लोकसभा निवडणूक २०२४ च्या तिसऱ्या टप्प्यातले मतदान मंगळवारी ७ मे रोजी होणार असून या टप्प्यात होणाऱ्या ११ लढतींपैकी अनेक लढती चुरशीच्या आहेत. तर या लढतींमध्ये राज्याच्या राजकारणातील अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
तिसऱ्या टप्प्यातील सर्वाधिक चर्चेची आणि प्रतिष्ठेची लढत बारामतीची ठरली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद - भावजयीचा सामना रंगणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाकडे देशभराचे लक्ष लागले आहे. ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे विद्यमान अध्यक्ष अजित पवार या काका - पुतण्यांच्या राजकारणाचा कस पाहणारी ही निवडणूक होणार आहे.
कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराज यांच्या विरोधात संजय मडंलिक उभे आहेत.
इथे होणार मतदान रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागीरी - सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या ११ मतदार संघांत मतदान होणार आहे.दोन्ही छत्रपती रिंगणात
साताऱ्याचे उदयनराजे भोसले आणि कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या दोन्ही छत्रपतींना निवडणूक सोपी नाही.राणे- तटकरेंचा कस लागला रत्नागीरी-सिंधुदुर्गात नारायण राणे व रायगडात अजित पवार गट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा कस या निवडणुकीत लागला आहे. प्रचाराची रणधुमाळी सुरु असताना अजित पवार, नारायण राणे आणि सुनील तटकरे हे आपापल्या मतदारसंघात अडकून पडले आहेत. राणे, तटकरेच नव्हे तर अजित पवार यांच्या राजकीय अस्तित्वाची ही निवडणूक ठरणार आहे. तर सोलापुरात प्रणिती शिंदे यांच्या उमेदवारीमुळे सुशीलकुमार शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. हातकणंगले मतदारसंघात राजू शेट्टी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शेट्टी यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई आहे.