*✍️गडब / अवंतिका म्हात्रे*
दिनांक ०४मे२०२४ रोजी
रत्नागिरी जिल्ह्यातील 32रायगड लोकसभा मतदारसंघातील गुहागर खेड दापोली चिपळूण मंडणगड तालुक्यातील एकत्र दिव्यांग मतदार जनजागृती कार्यक्रम गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्था व महसून विभाग गुहागर यांच्या प्रयत्नने गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थाच्या सहभागृहात संपन्न झाला रायगड जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील दिव्यांग मतदार जनजागृती करून रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर खेड दापोली चिपळूण मंडणगड या तालुक्यातील मतदानाविषयी जनजागृती होण्यासाठी कार्यक्रमचे प्रस्ताविक उदय रावणग यांनी केले
महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष तथा डिस्टिक आयकॉन साईनाथ पवार यांनी दिव्यांगाना मार्गदर्शन करताना सांगितले की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाने दिव्यांग व ८५वर्षा वरील वयोरुद्ध व्यक्ती यांना घरूनच मतदान, मतदान केंद्रावर व्हीलचेअर रॅम्प रोलिंग दिव्यांग व्यक्तींना ने-आण करण्यासाठी दिव्यांगरथची व्यवस्था, ज्यांना चलनवळण करण्यास समस्या त्यांना सहाय्यक अशा विविध सोयी देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे सर्वं दिव्यांगांनी कोणीही घरी न राहता मतदान करा व आपली नोंदणी दिव्यांग म्हणून करा जेणेकरून आपल्याला योग्य त्या सुविधा मिळतील महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विलास गोरे जिल्हापाध्यक्ष विनायक निवळे गुहागर तालुकाध्यक्ष उदय रावणग रायगड जिल्हा संघटक सहकार्य अपंग कल्याणकारी संस्थेचे सचिव शिवाजी पाटील व मंडणगड गुहागर दापोली चिपळूण खेड तालुक्यातील दिव्यांग पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्था अध्यक्ष उदय रावणग सचिव भरत घेवडेकर कोषध्यक्ष प्रकाश अंनगुडे उपाध्यक्ष दशरथ कदम व संस्थेचे पदाधिकारी यांनी अथक प्रयत्न केले