गडब / सुरेश म्हात्रे
मुंबई गोवा महामार्गावरील अपघातग्रस्तांसाठी देवदूत ठरलेल्या पेण येथील कल्पेश शरद ठाकूर यांचे काय अहवाल प्रकाशन साई सहारा रेस्टॉरंटच्या निमित्त महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते बुधवारी दिनांक 29 रोजी सायंकाळी संपन्न झाले . त्यांच्यासोबत खासदार सुनील तटकरे राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे पेण विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र पाटील अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी आणि माजी आमदार व जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील वैकुंठ दादा पाटील नागराध्यक्ष प्रीतम पाटील तालुका अध्यक्ष दयानंद भगत जितेंद्र ठाकूर नरेंद्र ठाकूर शशिकांत भगत यशवंत दादा घासेआदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सहारा रेस्टॉरंट तालुकाध्यक्ष दयानंद भगत जितेंद्र ठाकूर नरेंद्र ठाकुर शशिकांत भगत यशवंतदादा घासे आदी मान्यवर उपस्थित होते .यावेळी साई सहारा रेस्टॉरंटच्या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळेल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले . तर देवदूत ठरलेल्या कल्पेश ठाकुर करत असलेल्या अपघातग्रस्तांची मदत आणि जनसेवेच काम कौतुकास्पद असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी सांगीतले .
याप्रसंगीउपस्थित मान्यवरांकडूनही कल्पेश ठाकूर यांचे कौतुक करण्यात आले .