गडब / अवंतिका म्हात्रे
लोकसभेची निवडणूक मतदान प्रक्रिया ७ मे पार पडली. तब्बल २५ दिवस लोटल्यानंतर जसजशी निकालाची तारीख जवळ येत आहे, तसतसे कार्यकर्ते राजकीय आडाखे बांधण्यात व्यस्त झाले आहेत.. जवळ असलेल्या मतांची आकडेमोड करीत राजकीय चर्चा रंगत असून अंदाज वर्तविताना थेट पैजेपर्यंत कार्यकर्त्यांची मजल गेली आहे.
रायगड लोकसभा मतदारसंघात एकूण ६२ टक्के मतदारांनी मताचा अधिकार बजावला. काही मतदारांनी या राष्ट्रीय कर्तव्यात सहभाग घेतला नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. मतदानावर कार्यकर्त्यांसह नेतेमंडळीतही गरमागरमी चर्चा होत असल्याचे दिसत आहे.
रायगड लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढत अतिशय चुरशीची होणार असल्याची चर्चा सध्या नागरिकांमध्ये सुरू आहे. गावातील बैठकीच्या ठिकाणी दररोज होणारी ही चर्चा अजूनही काही दिवस चालणार आहे. ती कधी लाखांच्या लिडवर तर कधी जय- पराजयावर पैजा लावण्यावर येऊन थांबते. कार्यकर्ते नेत्याला खुश करण्यात व्यस्त आहेत. निवडणुकीत दावे- प्रतिदावे करीत उमेदवारांनी आश्वासने, प्रलोभने देऊन
मतदारांना आपल्या बाजूने करण्यासाठी प्रयत्न केले. हे सर्व चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असताना होणारी गरमागरमी करायलाही काही जण पुढे येतात,
पण सध्या सुरू असलेली ही चर्चा चार जूनपर्यंत थांबायची नाही, हे प्रयत्न किती टक्के सार्थकी ठरले, हे येणारा ४ जून रोजी निकालच सांगेल, पण सध्या सुरू असलेली ही चर्चा चार जूनपर्यंत थांबायची नाही. एवढे मात्र खरे. अनेकदा कार्यकर्ता ज्या पक्षाचे काम करतो, त्याच पक्षाची बाजू पुढे नेण्याचे काम तो चर्चेतून करतो.
दावे-प्रतिदावे सुरूच
निवडणुकीनंतर उमेदवारांच्या भवितव्याची चर्चा रंगू लागली आहे. महायुती व महाविकास आघाडी दोन्ही पक्षाच्या पुढाऱ्यांकडून दावे- प्रतिदावे होत असले, तरी मतदार देखील दोन, पाच हजारांच्या मताधिक्यांची तफावत राहणार अशी चर्चा करू लागले आहे. प्रत्येक मतदार संघात अपक्ष व इतर पक्षाचे उमेदवार किती मते घेणार? यावर मताधिक्याची मदार राहणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारांचे भवितव्य दोन्ही जिल्ह्यातील मतदारांच्या पसंतीवर अवलंबून राहणार हे निश्चित.
कधी चर्चा येतेय मुद्यावरून गुद्यावरही ■ काही तालुक्यांच्या विधानसभा
मतदारसंघ समाविष्ट असतानाही चर्चेतील मतदार तेवढा फिरला नसतानाही दावा करीत आपलाच उमेदवार निवडून येण्याचा दावा करतो. कारकिर्द, पक्ष बदल, पैसा, गाजावाजा, निवडणूक यंत्रणा, नव्या, जुन्या मुद्याचा प्रभाव, पक्षाची सत्ता, कार्यकर्त्यांची फळी, जातीय समीकरणे आदी विषय घेऊन सुरू होणारी चर्चा कधी मुद्यावरून गुद्यावरही येते.
■ मतदान संपले असले तरी दोनशे किमी लांबीचे, हजार गावांच्या मतदारांचे, दोन प्रांतांच्या समावेशाचे व निवडणूक निकालाची तारीख जवळ येताच पुन्हा मतांची आकडेमोड सुरू आहे. अपक्षांच्या बेरजेचे गणित सुद्धा मांडत आहेत.