✍️गडब / अवंतिका म्हात्रे
पाटणसई ग्रामपंचायत वजरोली परिसरात अंबा नदीवर मोठ्या प्रमाणात मृत माशांचा खच पडल्याचे आंघोळीसाठी गेलेल्या तरुणांच्या निदर्शनास आले . अंबा नदीत रसायन सोडल्याने या माशांचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे . दरम्यान असणाऱ्या के टी बंधाराच्या जवळ हे पाणी पोहोचल्याने बंधाऱ्यातून पुरवठा होणाऱ्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करू नये असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे .
.या संदर्भात आरोग्य विभागास कळविण्यात आले . तात्काळ आरोग्य सेविका आणि आरोग्य सहाय्यक पी एस तांबोळी यांनी घटनास्थळी भेट दिली सदर पाण्याचे नमुने जैविक व रासायनिक तपासणी करिता पाठवण्यात आल्याचे आरोग्य सहाय्यक पी एस तांबोळी यांनी सांगितले दरम्यान मासेमारी करण्याकरिता रात्रीच्या वेळेस नदीपत्रात काही अज्ञातंकडून केमिकल मिसळले जात असल्याचे स्थानिकांनी सांगितले . पाण्यात केमिकल टाकून मासेमारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे .
72 तासांमध्ये तपासणीचा अहवाल येणार असून तोपर्यंत कोणीही या पाण्याचा वापर पिण्यासाठी करू नये असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे .
मृत मासे मोठ्या प्रमाणात कुजल्याने पाणी मोठ्या प्रमाणात दूषित होणार असल्याने त्याचा वापर कोणीही पिण्यासाठी करू नये दरम्यान ही घटना गुरुवारी घडली असली तरी के टी बंधाऱ्यातून पाणीपुरवठा होणाऱ्या काही गावांमध्ये या प्रकाराबाबत काहीच माहिती नव्हती जनतेने या पाण्याचा वापर गुरुवारपासून सुरूच ठेवला होता काही ग्रामपंचायतीने शुक्रवारपासून पाण्याचा वापर करू नये असे आवाहन करण्यात आले आहे .