Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

♦️गडबच्या ग्रामसभेत जे. एस.डब्ल्यू कंपनीने केलेल्या कॉलनी बांधकाम बंद करण्याचा कारावी ग्रामस्थांचा निर्धार!♦️

Responsive Ad Here
📍वडखळ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांची योग्य मध्यस्ती📍

✒️गडब/सुरेश म्हात्रे✒️

पेण तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत गडब ग्रामपंचायतीची ग्रामसभा,२२ मे २०२४ रोजी गडब ग्रामपंचायतीच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.यावेळी करावी ग्रामस्थ व महीलामंडळ ग्रामपंचायत गडबच्या कार्यालयात घुसून ग्रामसेविका धनावडे,सरपंच सौ.मानसी मंगेश पाटील,उपसरपंच दिनेश म्हात्रे आणि इतर सदस्यांना आपल्या घरांना तडे गेल्याचे म्हणत जाब विचारला.यावर निरुत्तर होत सरपंच सौ.मानसी पाटील,राजश्री धनावडे यांनी जे. एस.डब्ल्यू ने केलेल्या बांधकामा ठिकाणी जाऊन संबंधितांना जाब विचारण्याचे ठरले.

        संबंधित ठिकाणी ग्रामपंचायत बॉडी (कमिटी) ग्रामस्थ मंडळ करावी, व पत्रकार असे मिळून संबंधितांना जाब विचारण्यास केले.तद नंतर तेथे असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी अरेरावी ची भाषा वापरून, मोबाईल द्वारे शनचीत्रे काढण्यास सुरुवात केली.यावेळी ग्रामास्ता व कर्मचारी यांच्यात बाचाबाची झाली. तद नंतर वडखळ पोलिसांना व कंपनीच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले.जे.एस.डब्ल्यू चे असिस्टंट मॅनेजर कुमार थत्ते आणि त्यांची टीम घटना स्थळी दाखल झाली व वडखळ पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रसाद पांढरे घटनास्थळी दाखल झाले. तद नंतर वस्तुस्थिती जाणून घेऊन पांढरे यांनी कुमार थत्ते यांना विचारणा केली की,कामासंदर्भात NOC आहे का यावर जे एस , डब्ल्यू चे कुमार थत्ते यांनी नाही म्हणून सांगितले .तेव्हा वडखळ पोलीस निरीक्षक पांढरे यांनी बैठक घेऊन याबाबत तोडगा काढण्याचे ठरले, व करावी ग्रामस्थांचे समाधान झाले व २४ तारखेला ठरल्या ठिकाणी जाण्याचे कबूल केले.