आमचा विकासाला अजिबात विरोध नाही; परंतु विकास जर भूमीपुत्रांच्या छाताडावर बसून होत असेल, तर आम्हाला ते कदापि मान्य नाही, असे शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते अतुल म्हात्रे यांनी शासनास ठणकावून सांगितले. प्रकल्पाच्या माध्यमातून विकास होत असताना येथील भूमीपुत्र शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवावे आणि या विकासाचे भागीदार म्हणून येथील भूमीपुत्रांना सामावून घ्यावे, असेही म्हात्रे म्हणाले. रायगड जिल्ह्यामध्ये होऊ घातलेल्या एमएमआरडीए प्रकल्पामध्ये उरण, खोपटा तसेच पेणमधील एकूण १२४ गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यातील पेण येथील सार्वजनिक विद्या मंदिर येथे तालुक्यातील शेतकऱ्यांची बैठक संपन्न झाली. त्याअतुलवेळेला शेतकऱ्यांशी म्हात्रे यांनी संवाद साधला.
अतुल म्हात्रे यांचे प्रतिपादन
दिवसाला एकाच वेळी २,००० हरकतदारांना बोलावू शकतील, त्यामुळे या शासनाला आपल्या हरकती विचाराधीन घ्यायच्याच नाहीत असंच दिसतेय. अतुल म्हात्रे यांनी जमलेल्या शेतकऱ्यांना चित्रफितीद्वारे एमएमआरडीए प्रकल्प समजावून सांगितले आणि शेवटी लढाईला अतुल म्हात्रे, कायदेतज्ज्ञ अॅड. सुरेश ठाकूर, बांधकाम व्यावसायिक शहाजी पाटील, सामाजिक कार्यकर्ते अरूण शिवकर, माजी सभापती महादेव दिवेकर, पी.डी. पाटील, दिलीप पाटील, शेखर शेळके आदींसह शेकडो भूमीपुत्र शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांनो, संघटित
व्हा : पाटील
यावेळी विकासक शहाजी पाटील यांनी शेतकऱ्यांनी संघटित होण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, १०० एकर जमिनीचा एक प्रोजेक्ट केल्यास शेतकऱ्याला ४० टक्के विकसित भूभाग मिळणार आहे. परंतु, स्वतंत्रपणे जमीन शासनाला दिल्यास फक्त १२.५ टक्के विकसित भूभाग मिळेल आणि शासन स्वतंत्र जमिनी देतात म्हणून वाढीव १० टक्के विकसित भूभाग देतील. म्हणजेच, तुम्हाला २२.५ टक्के विकसित भूखंड मिळेल. मात्र, यामध्ये १७.५ टक्क्याला तुम्ही मुकणार आहात, याचाही विचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी शासनाविरूद्ध आक्रमक होणे गरजेचे आहे, अन्यथा हे शासनकर्ते शेतकऱ्यांवर अन्याय केल्याशिवाय राहणार नाहीत.