गडब/सुरेश म्हात्रे
⬛पेण तालुक्यातील गावठी दारू बंद करण्याची मागणी होत असताना गडब गावात रस्त्याच्या कडेला हरिचंद्र पाटील नावाचा इसम मोठ्या प्रमाणात गावठी दारू विक्री करत असतो. या संदर्भात गडब येथील पत्रकार सुरेश म्हात्रे यांनी वडखळ पोलिसांना माहिती देऊन ही कोणतीही कारवाई होत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. पेण तालुक्यातील गडब गावात नुकताच गावठी दारू बनवण्याचे सात ते आठ धंदे सुरू आहेत. याबाबत वडखल पोलिसांना माहिती देऊन ही कोणतीही कारवाई होत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. हरिश्चंद्र पाटील हा इसम निवडणुकीच्या काळात बेफान दारू विकी करत असल्याचे आढळून आले आहे. मात्र ओळखल पोलिसांच्या बीट हवलदाराकडून त्याच्यावर कोणत्याही प्रकारे कारवाई केलीजात नसल्याबद्दल येथील पत्रकार म्हात्रे हे जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.