Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

अवकाळी पावसामुळे वीटभट्टी व्यवसाय संकटात तयार वीट भिजून लाखोंचे नुकसान; व्यावसायिक रडकुंडीला !

Responsive Ad Here
गडब/सुरेश म्हात्रे

स्वतःचे घर बांधण्यासाठी असो किंवा
बांधकाम क्षेत्र असो महत्वाचा घटक म्हणून ओळख असलेला वीटभट्टी व्यवसायाला ऐन वीट तयार होण्याच्या सुरुतीलाच पाऊस पडल्याने वीटभट्टी व्यवसाय संकटात सापडला आहे. गेले एक-दोन दिवस पेण तालुक्यात दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होऊन सायंकाळच्या दरम्यान पावसाने वादळी वाऱ्यासह सुरवात करत आहे.
अनेक ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अचानकपणे पडणाऱ्या पावसाने वीटभट्टी व्यवसायकाची मोठी तारांबळ उडाली आहे. तालुक्यात ग्रामीण भागात वीटभट्टी व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. अनेक ठिकाणी वीटभट्टी तयार करण्याचे काम सुरु होते तर काही भागात भट्टी रचण्याचे काम सुरु होते परंतु अवकाळी पावसाने अचानकपणे हजेरी लावल्याने वीटभट्टी व्यवसायला मोठा आर्थिक फटका बसला असून लाखोंचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पुढील काळात वीटभट्टी व्यवसाय करणे जिकरीचे होणार आहे.
पेण तालुक्यात महत्त्वाचा असलेला वीटभट्टी व्यवसाय गेल्या दोन-चार वर्षांपासून संकटात सापडला आहे. आतातर अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे संकटात सापडलेल्याने वीटभट्टी व्यवसायिक हवालदिल झाले आहेत. देशात महागाईचा भडका उडाल्याने पेट्रोल डिझेल याच्या दरात वाढ झाल्याने अनेक वस्तूच्या किंमती वाढत आहेत. तूस गेल्या वर्षी ५ टणाचे २० ते २२ हजार होते आता ३५ ते ४० हजार पर्यंत वाढला आहे. तसेच एक टन कोळसा ८ ते ९ हजार होते आताचे दर १२ ते १३ हजार आहे. माती, मजूर व दरवर्षी पावसामुळे वीटभट्टी व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान
गेल्या दोन ते चार वर्षांपासून वातावरणात मोठा बदल होऊन वर्षाचे बाराही महिने अचानक पाऊस पडत असल्याने वीटभट्टी मालकांनी केलेली मेहनत वाया जात आहे. तसेच तयार केलेली वीट पावसात भिजत असल्याने दरवषी लाखों रुपयाचे नुकसान सहन करावे लागत असून मिळत असलेला उत्पन्न पाण्यात जात आहे. यापुढे किती नुकसान सहन करायचा असा सवाल वीटभट्टी व्यावसायिक विचारात आहेत. त्यामुळे शासनाने इतरांप्रमाणे आमच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्याव, नाहीतर पुढील काळात वीटभट्टी व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर असतील असे सर्वच वीटभट्टी व्यावसायिकांचे म्हणणे आहे.प्रत्येक मटेरियलचे पैसे वाढल्याने यापुढे वीटभट्टी व्यवसाय करायची की नाही, असे प्रश्न वीटभट्टी व्यावसायिकांपुढे निर्माण झाला आहे.
तालुक्यात लहान मोठे व्यावसायिक, शेतकरी शेतातील मातीचा उपयोग करुन वीटभट्टी व्यवसाय करतात. बांधकाम क्षेत्रासाठी आवश्यक असणाऱ्या बहुतांश विटांचा पुरवठा तालुक्यातूनच होतो. काही लाखांत गुंतवणूक असलेला
हा व्यवसाय वीटभट्टी व्यावसायिक व कामगारांना चांगला
आर्थिक लाभ मिळवून देतो. प्रतिवर्षी ऑक्टोबरपासून
सुरू होणाऱ्या थंडीच्या हंगामापासून अनेक ठिकाणी वीट
व्यावसायिक आदिवासी कामगारांच्या मदतीने विटा
पाडायला सुरुवात करतात. एप्रिल मे महिन्यात उष्णतेची
दरवर्षी अचानक अवकाळी पाऊस पडून 66 विटा भिजून आमचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. त्यात वाढत्या महागाईचा दिवसागणिक फटका व्यवसावर बसत आहे. त्यामुळे या पुढे व्यवसाय करावा की नाही, असा प्रश्न सर्वच वीटभट्टी व्यावसायिकावर पडला आहे. वीटभट्टी तयार करण्याचा जो शेवटचा टप्पा असतो, तोच खरा आम्हाला नफा असतो. मात्र शेवटच्या टप्यातच पाऊस पडत असल्याने मोठा आर्थिक फटका आम्हाला बसत आहे. त्यामुळे शासनाने पेण तालुक्यातील सर्वच वीटभट्टी व्यावसायिकांना नुकसान भरपाई द्यावी.
-अनंत कडू, वीटभट्टी यावसायिक, गडब तीव्रता जास्त असल्याने नोव्हेंबर पासुनच सुरुवात करतात. मात्र यावर्षी उशिरा सुरवात झाल्याने वीटभट्टी व्यावसायिकांना पावसाचा फटका बसला आहे. तालुक्यातील बहुतांशी वीट व्यावसायिक आदल्या वर्षीच पुढील वर्षाची तयारी करतात. उन्हाळा वाढल्यानंतर या व्यवसायावर परिणाम होतो. यावर्षी मात्र उशिरा सुरुवात केल्याने अनेक भागात वीटभट्टी करण्याचे काम सुरु होते तर काही भागात कच्ची वीट तयार करून भट्टी लावून देण्याचे काम सुरु होते. परंतु सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने अचानक सुरुवात केल्याने अनेक वीटभट्टी व्यावसायिक विटांवर प्लास्टिक टाकल्याचे दिसून आले. परंतु लाखोंच्या संख्येने तयार झालेल्या सर्वच विटा झाकणे शक्य न झाल्याने मोठा भुर्दंड वीटभट्टी व्यावसायकावर पडला आहे.