Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

नावातच आहे दारुबंदी प्रत्यक्षात मात्र अधिकाऱ्यासह विक्रेत्यांची होते आर्थीक चांदीकुमठा-शिवनखेड रोडवर बेकायदा दारु विक्रीला आला ऊत,दुर्लक्ष करतात!

Responsive Ad Here
गडब- सुरेश म्हात्रे

⬛दि.७।५।२४ रोजी होत असलेल्या मतदानाच्या पार्श्वभुमीवर निवडणुक प्रक्रिया शांततेत व्हावी. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित असावी. आणि मदीप्रेमींमुळे अशांतता पसरु नये, या करिता मा. जिल्हाधिकारी वर्षाताई घुगे यांनी दि.५ ते ७ मे दरम्यान सबंध लातुर जिल्ह्यात दारुबंदीचे आदेश सर्व संबंधित यंत्रणा, अधिकारी यांना दिले असले तरी पण ही बंदी केवळ नावापुरती व कागदावरच आहे की काय? असा प्रश्न हाळी ते कुमठा शिवनखेड रोडलगत असलेल्या ऊगीले पाटीवर होत असलेल्या अवैध दारु विक्रीकडे बघून उपस्थित होतो. तसेच दारुबंदी अधिक्षक राऊत दुर्लक्ष करित असल्यानेच या ठिकाणी ड्रय डे सह बाराही महिने अवैध दारू विक्री ला ऊत आल्याचे तसेच जिल्हाधिका-याच्या आदेशाला सर्व संबंधित अधिकारी केराची टोपली दाखवितात. आणि अवैधदारु विक्री करणा-यांकडून स्वतःची आर्थीक चांदी करून घेतात. अशी कुजबूज हाळी परिसरात ऐकू येत आहे. तसेच कुमठा, शिवनखेड व हाडोळती रोड लगतच्या ढाब्यात ड्रय डे दिवशी तर अवैध दारु विक्री मोठ्याप्रमानात होत असल्याचे बघून या ठिकाणी दारुच्या पेठ्या शासन मान्य किरकोळ विक्रेता दुकाणदार देतो. त्या शराब
हाळीच्या देशी दारु दुकाणचा परवाना रद्द करून या ठिकाणच्या
अवैध दारु विक्रेत्यांवर तडीपारीची कारवाई करण्याची धमक संबंधित अधिका-यानी दाखवावी, अन्यथा निवडणुककाळात कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. अशी चर्चा अवैध दारु विक्री होत असलेल्या ठिकाणी आहे. लोकसभा निवडणुक मतदान दिनांक सात मे रोजी असल्याने त्यापुर्वी पाच में पासुन सात मे पर्यंत सबंध लातुर जिल्ह्यात ड्रय डे राहील. म्हणजे दारु विक्रीस बंदी राहील. असे आदेश जिल्ह्याच्या प्रथम महिला जिल्हा धिकारी असलेले मा. वर्षाताई घुगे यांनी निर्गमित केले आहे. मात्र हाळी व उऊगीले पाटी-मोरतळवाडी येथील ड्रय डे सह सालभर रात्रं-दिवस होत असलेली अवैध दारुची विक्री बघता नावातच आहे दारुबंदी आणि अवैध दारु विक्रेत्यांसह दारुबंदी अधिकारी यांची होते आर्थीक चांदी. असा सुर कानी पडतो. तेंव्हा वरील ठिकाणी गत कित्येक वर्षापासुन दिनदहाडे होत असलेल्या अवैध दारु विक्रीवर जिल्हाधिकारी मॅडम यांनी कायमचा आळा घालावा. व गरीब महिलांचे उध्वस्त होणारे संसार आणि कुंकू वाचवावे. कारण या ठिकाणी अवैध दारु विक्रीला ऊत आल्याचे आम जनतेला दिसते. मात्र तरीही दुर्लक्ष करतात दारुबंदी अधिकारी राऊत म्हणुन आता जिल्हाधिकारी कधी व कोणता निर्णय घेणार ? का राऊत -
२ बनणार? याकडे समस्त महिला वर्गाचे लक्ष लागले आहे.