Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

श्री.सोपान चांदे यांचा राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कराने सन्मान

Responsive Ad Here
गडब/सुरेश म्हात्रे 

रायगड जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा रानवडी बु।।येथील पदवीधर शिक्षक श्री. सोपान रामचंद्र चांदे यांना नुकताच आविष्कार फौंडेशन कोल्हापूर यांच्या वतीने राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार-२०२४ देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या सेवेची सुरुवात 1994 रोजी शिक्षक पेशामध्ये झाली तसेच पदवीधर पदावर 2009 मध्ये त्यांची नियुक्ती झाली .तसेच 2010 मध्ये रायगड जिल्हा शिवभूमी आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला .त्यानंतर श्री सोपान चांदे यांनी 2001 मध्ये अखिल पोलादपूर प्राथमिक शिक्षक संघाचे तालुक्याचे अध्यक्षपद भूषविले .त्यानंतर त्यांना 2011 मध्ये अखिल रायगड प्राथमिक शिक्षक संघाच्या सरचिटणीस पदी त्यांची नेमणूक झाली; तसेच 2016 मध्ये जिल्हाध्यक्ष पदावर बिनविरोध निवड झाली व आजपर्यंत
ते जिल्हा संघाच्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.त्यानंतर रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटनेच्या मध्यवर्तीच्या जिल्हा संघाच्या अध्यक्ष पदावर ते विराजमान झाले .त्यांना
 2014 मध्ये महाड- पोलादपूर मतदारसंघातून पेण प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या संचालक पदावर निवडून आले ;तसेच 2022 च्या परिवर्तन पॅनल च्या माध्यमातून संपूर्ण पॅनल निवडून आले व पहिला चेअरमन होण्याचा मान त्यांना मिळाला तसेच सहकार क्षेत्रामध्ये उत्तुंग आणि पारदर्शक काम पतपेढीच्या माध्यमातून मानद सचिव म्हणून ते करत आहेत.
 शिक्षकांच्या प्रश्नासाठी व अडचणी सोडवण्यासाठी सतत 24 तास झटणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे.
         ते सध्या ज्या शाळेवर कार्यरत आहे ती रानवडी बु ।। शाळा तालुक्यातील एक आदर्श शाळा म्हणून सर्वांना परिचित आहे.शाळेला मागील वर्षी ग्रामीण गुणवत्ता आदर्श शाळेचे प्रथम क्रमांकाचे बक्षिस प्राप्त झाले असून चालू वर्षी सुद्धा शाळेला परसबाग स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळाला असून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत शाळेस तालुक्यातून तृतीय क्रमांकाचे बक्षिस 100000₹मिळाले आहे. त्यांच्या कार्याची दखल म्हणून आविष्कार फौंडेशन कोल्हापूर यांच्या वतीने राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुरस्कार जाहीर झाल्यापासून त्यांच्यावर शिक्षण ,कला, क्रीडा व सामाजिक क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.