Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

घरकुल योजनेत हेराफेरीनिगडे ग्रामपंचायतीमधील प्रकार उघड

Responsive Ad Here
गडब/सुरेश म्हात्रे

मोदी आवास योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात देशपातळीवर घरकुल योजना राबविण्यात आली आहे. मात्र, या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे उघड होत आहे. पेण तालुक्यातील निगडे ग्रामपंचायतीमध्ये ३५ लाभार्थ्यांची यादी मंजूर झाली असून, त्यांच्या खात्यावर १५ हजारांप्रमाणे पहिला हप्ताही जमा झाला आहे. मात्र, ३५ लाभार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हेराफेरी असल्याचे समोर आले आहे.
याबाबत पेण पंचायत समिती येथून घेतलेल्या माहितीनुसार निगडे ग्रामपंचायतीमध्ये २५ जुलै २०२३ रोजी सर्वेक्षण करून ग्रामसभेच्या ठरावाने ४६ जणांच्या नावांची यादी पंचायत समितीला देण्यात आली होती. त्यातील ३५ जणांच्या नावाची यादी मंजूर करण्यात
निगडे येथील
३५ लाभार्थ्यांची फेरतपासणी करण्याचे आदेश बांधकाम अभियंता सूर्यकांत परब यांना दिले आहेत. जोपर्यंत योग्य लाभार्थी असल्याची खात्री होत नाही, तोपर्यंत आम्ही लाभार्थ्यांचे बंद केलेले खाते पुन्हा चालू करणार नाही. दोषींवर रितसर कारवाई करू.
भाऊसाहेब पोळ, गटविकास अधिकारी
 ही यादी १८ सप्टेंबर २०२३ रोजी ग्रामसेवक व सरपंचाच्या सहीने गटविकास अधिकाऱ्यांना दिली. या यादीमधील लाभार्थ्यांमध्ये सरकारी कर्मचारी, मयत व्यक्ती, पक्की घर असणाऱ्या व्यक्तींचा भरणा मोठ्या प्रमाणात होता. ही सर्व बाब ग्रामसेविका विशाखा पेडवी यांना माहिती त्यांनी सदरील यादी पंचायत समिती पेण येथे दिली. घरकुलांची अंतिम यादी झाल्यानंतर या यादीची पडताळणी न करता ३५ लाभाथ्यांच्या खात्यावर १५ हजारांप्रमाणे २८ फेब्रुवारी २०२४ रोजी योजनेचा पहिला हप्ता जमा झाला. मात्र, निगडे गावातील जागरुक नागरिकांना हे लक्षात आले की, ज्यांना खरंच लाभ द्यायचे होते, ते लाभार्थी वंचित राहिले असून, ज्यांची घरं पक्की आहेत, त्यांना मोदी आवास घरकुल योजनेचा लाभ मिळाला आणि तशा प्रकारची तक्रार गटविकास अधिकारी यांच्याकडे केली. गटविकास अधिकारी यांना ग्रामसेविकेने केलेली चूक लक्षात आणून देताच त्यांनी तातडीने सर्वच्या सर्व म्हणजेच ३५ खाती तात्पुरती बंद केली.