✍️ *गडब / अवंतिका म्हात्र*
विधान परिषदेचे चार सदस्य हे ७ जुलै रोजी निवृत्त होत आहेत. या चारही मतदारसंघांत १० जून रोजी मतदान होणार आहे .अलिबाग विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर आणि शिक्षक, कोकण पदवीधर तसेच नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांत १० जूनला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेस प्रदेश सचिव ऍड प्रवीण ठाकूर हे इच्छुक आहेत. त्या संदर्भातील निवेदन ऍड. ठाकूर यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पाठवले आहे.