✍️गडब / अवंतिका म्हात्रे
दिनांक १९ एप्रिल २०२४ रोजी रोहा तालुक्यातील चणेरा विभागातील कुणबी समाज मंदिरा येथे. दिव्यांग मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन रोहा तहसील कार्यालय आणि सहकार्य अपंग कल्याणकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नायब तहसीलदार श्रीमती अंधारे मॅडम यांच्या उपस्थितीत संपन्न झाला
डिस्ट्रिक आयकॉन तथा महाराष्ट्र अपंग कर्मचारी संघटनेचे राज्यध्यक्ष साईनाथ पवार यांनी दिव्यांग मतदार जनजागृती बाबत प्रमुख मार्गदर्शन केले व त्यात त्यांनी दिव्यांग मतदारासाठी भारत निवडणूक आयोगाकडून केलेल्या सोयी सुविधा बाबत जसे की दिव्यांगाना घरून मतदार करण्याची सोय, मतदान केंद्रावर व्हीलचेअरची व्यवस्था, रॅम रेलिंग तसेच दिव्यांगांना मदतनीसाची सोय, इत्यादी सुविधांबाबत मार्गदर्शन केले . सर्वांचा सहभाग हाच लोकशाहीचा पाया आहे, तुमचे मत महत्त्वाचे आहे सर्वांनी मतदान करून लोकशाही भक्कम करण्यास सहभाग दाखवा व आपला आदर्श समाजासमोर ठेवा असे सर्व दिव्यांग मतदारांना सांगितले.
.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य अपंग कल्याणकारी संस्थेचे सचिव शिवाजी पाटील चणेराविभाग प्रमुख प्रवीण मोरे गोरख बाबरे आदी दिव्यांग सदस्य तसेच मंडळ अधिकारी जयेश ठाकूर चणेरा तलाठी तेजश्री मोरे चांडगाव तलाठी दीपक मोरे कोकबन तलाठी विशाल चोरगे परिवेक्षक तलाठी बाळासाहेब थोरात अभिजीत महाडिक पोलीस पाटील रहूप भाई यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत मुंगळे व आभार कोतवाल रवी शिंदे यांनी केले व कार्यक्रमाची सांगता मतदान करण्याची प्रतिज्ञा करून करण्यात आली