गडब/सुरेश म्हात्रे
⬛चैत्र महिन्याची चाहूल लागली की, मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते. गुढीपाडवा महाराष्ट्रातील चैतन्याचा सण. या सणाला स्त्री अस्मितेचे प्रतीक म्हणून साजरा करण्याची प्रथा गेल्या १२ वर्षांपूर्वी पेण शहरात सुरु आहे. महिला अत्याचाराविरोधी मंच व अंकुर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पेण येथे महात्मा गांधी वाचनालयात सार्वजनिकरित्या महिला वाजतगाजत मिरवणुकीद्वारे गुढी उभारतात. याकरीता विविध स्तरातील महिला वाजत गाजत गुढी जुन्या रायगड बाजारापासून महात्मा गांधी मंदिरातपर्यंत नेत असतात.
याबाबत नुकतीच डॉ. वैशाली पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनाची बैठक झाली. यावेळी डॉ. नीता कदम, खैसर मुजावर, दीपश्री पोटफोडे, स्वाती मोहिते, कविता पाटील, शैला धामणकर, ज्योती राजे, संयोगीता टेमघरे, अॅड. वैशाली कांबळे आदी मंचाच्या सदस्य उपस्थित होत्या.
या कार्यक्रमामध्ये सर्व स्तरातील महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे यावेळी डॉ. वैशाली पाटील यांनी सांगितले आहे. तसेच, दरवर्षीप्रमाणे प्रत्येक धर्मातील एक महिला, मोलकरीण, मतिमंद आदींद्वारे गुढी उभारली जाईल. महिला मंचाच्यावतीने पेणमधील महिलांनी या रॅलीला सकाळी ९:३० वाजता जुन्या रायगड बाजाराजवळ उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.ग्रहांवर आधाररत कालगणना पंचांगाच्या माध्यमातून आपल्याला कळते म्हणून संवत्सरारंभाच्या दिवशी गुढीबरोबर पंचांगावरील गणपतीचे पूजन करावयास सांगितले आहे.