Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मद्यविक्री करणाऱ्यांवर करडी नजर

Responsive Ad Here
 गडब/सुरेश म्हात्रे

⬛लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व हॉटेल व्यावसायिक व मद्यविक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर आता निवडणूक आयोगाद्वारे पुरवठा साखळी व्यवस्थापन अॅप सुरु करण्यात आले आहेत. या अॅपमध्ये आत्ता दररोजची मद्य खरेदी व विक्रीची माहिती संबंधित व्यावसायिकांना द्यावी, लागणार असल्याने आत्ता यापुढे मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी मद्याचा महापूर व वाटप कुठल्याच पक्षाला करता येणार नाही.
सर्वच हॉटेल व मद्यविक्री करणाऱ्या व्यावसायिकांना आत्ता सप्लाय चैन मॅनेजमेंट अॅपद्वारे दैनदिन मद्य खरेदी व विक्रीची
माहिती द्यावी लागणार आहे व या माहितीवर राज्य निवडणूक आयोग आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे लक्ष राहणार आहे.
या अॅपमुळे चोरून दारू खरेदी विक्री, बनावट भेसळयुक्त दारू विकता येणार नाही. तसेच एखाद्याची नेहमीपेक्षा जास्त मद्य विक्री दिसून आल्यास त्याबाबत संबंधित विभागाकडून चौकशी
सुद्धा करण्यात येणार आहे. तसेच त्याने विशिष्ट फायद्यासाठी विशिष्ट लोकांना प्रमाणापेक्षा जास्त मद्य विक्री केली असेल तर संबंधितांचे लायसन्स सुद्धा निलंबित होण्याची दाट शक्यता आहे.
या अॅपमुळे आत्ता मोठ्या प्रमाणात व्यवहार सुरळीत व सुरक्षित दिसून येत आहे. त्यामुळे शासनाच्या महसुलामध्ये सुद्धा वाढ होण्यास मदत होणार आहे.