Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

शासकीय कर्मचाऱ्यांनाही मोफत धान्याचा मोहः चौकशी समिती स्थापनरायगडात १ हजार ६५६ सरकारी बाबूंनी घेतला मोफत धान्य योजनेचा लाभ

Responsive Ad Here

गडब/सुरेश म्हात्रे

रायगड जिल्ह्यात शिधा वाटप केंद्रांवर, मोफत धान्याची उचल करणारे १ हजार ६५६ नोकरदार सापडले आहेत. आधार सळलग्न प्रणालीमुळे 'सरकारी बाबूं'कडून मोफत धान्य उचल प्रकरणे उघडकीस आली आहेत. ही बाब उघडकीस येताच, या सर्वांचा धान्यपुरवठा आता थांबविण्यात आला आहे. तसेच मोफत धान्य उचल करणाऱ्या सरकारी बाबूंची चौकशी सुरू करण्यात आली आहे.पंतप्रधान गरीब कल्याण अन्य योजनेअंतर्गत अंत्योदय कुटूंबाना दरमहा ३५ किलो तर, प्राधान्य कुटूंबांना प्रति व्यक्ती पाच किलो धान्य वितरण सध्या केले जात आहे. याच योजनेअंतर्गत पुढील पाच वर्षांसाठी देशातील ८० कोटी लाभार्थ्यांना धान्य मोफत दिले जाणार आहे. यासाठी केंद्र सरकार १२ लाख कोटी रुपये खर्च करणार आहे. देशातील कोणताही भारतवासी उपाशी राहू नये, हा या योजनेचा उद्देश आहे. मात्र या मोफत धान्य योजनेचा लाभ घेण्याचा मोह सरकारी बाबू लोकांनाही आवरता आलेला नाही. जिल्ह्यातील १ हजार ६५६ नोकरदारांनी या योजनेचा लाभ घेतला असल्याची धक्कादायक बाब आता समोर आली आहे.शासनाकडून दारिद्र्य रेषेखालील कुटुंबासाठी तसेच अल्प उत्पन्न गटातील कुटूबांना शिधा वाटप केंद्रांवर धान्य वितरित केले जाते. मात्र, जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनी आपले उत्पन्न
लपवून मोफत धान्य योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. आधार लिंकीग प्रणालीमुळे सरकारी बाबू लोकांची ही मोफत धान्याची उचलेगिरी उघडकीस आली आहे.
ही बाब लक्षात येताच पुरवठा विभागाने या कर्मचाऱ्यांचा धान्य पुरवठा बंद केला आहे. तसेच धान्य उचल करणाऱ्यांची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. या चौकशी समितीच्या अहवालानंतर कर्मचाऱ्यांकडून वसुली केली जाणार आहे.