गडब/सुरेश म्हात्रे
लोकसभा निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पडावी. सर्वसामान्य नागरिकांनी निर्भयपणे मतदान करावे. निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी.
जनतेमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने वडखळ पोलीस ठाण्याच्या वतीने सशस्त्र पोलीस संचलन करण्यात आले.वरिष्ठांच्या आदेशानूसार उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फड़तरे यांच्या मार्गदर्शनाखाली वडखळ पो. नि. प्रसाद पांढरे यांच्या नेतृत्वाखाली स.पो.नि. गवई, पो.नि.पाटील, म.स.पो.नि. सांगळे यांच्यासह वडखळ पोलीस ठाणे १० अंमलदार, RCP वडखळचे ३० अंमलदार यांनी वडखळ शहरात संयुक्त संचलन केले. त्याच बरोबर वडखळ पोलीस ठाणे हद्दीत दंगल काबू योजना राबविली आहे.
वडखळ पोलीस ठाणे, एस.टी. बस स्थानक, वडखळ गाव अशी रूटमार्च काढण्यात आली.