✍️गडब / अवंतिका म्हात्रे
वडखळ पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्र 10 / 2024 कलम 420 ,465,471 भा द वि मधील पाहिजे आरोपीत नंदू पाटील हा सेवानिवृत्त शिक्षकाच्या मुलाला रेल्वेत नोकरी लावतो म्हणून १४६७०००/ रुपये (लाखो रुपये) घेवून गुन्हा दाखल झाल्या पासून गेली ४ महिने पळून गेला होता, तो आपले अस्तित्व सतत बदलून बदलून राहत होता
त्याची तांत्रिक माहिती काढून,सदर परिसरात psi.अभिजीत पाटील,Hc. अमित पाटील ह्यांनी पाळत ठेवून त्याला पकडून सदर गुन्ह्यात अटक केली आहे
आरोपीस आज रोजी मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने आरोपीस १९/४/२०२४ पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे पुढील तपास वडखळ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे करीत आहेत .
आरोपी अटके मुळे फिर्यादी शिक्षक सहकुटुंब पोलीस ठाण्यात येवुन पोलीसांचें कौतूक केले आहे व आभार मानले आहे.