गडब/सुरेश म्हात्रे
परिषदेची निवडणूक नाही. ही निवडणूक नगरपालिकेची महानगरपालिकेची किंवा विधानसभेची निवडणूक देखील नाही. देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे. देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे. कोणाच्या हातात देश सुरक्षित राहील, कोण देशाला विकासाकडे नेऊ शकेल यासाठी निवडणुकीमध्ये केवळ दोनच पर्याय आपल्या समोर दिसतात. पहिला पर्याय विश्व गौरव विकासपुरुष नरेंद्र मोदीजी आणि राहुल गांधींच्या नेतृत्वातली 26 पक्षाची खिचडी असे दोन पर्याय आपल्यासमोर आहेत. विरोधकांची खिचडी झाली असून त्यांच्या इंजिन मध्ये परिवारासाठीच जागा आहे.
मोदीजींच्या नेतृत्वामध्ये महायुती एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वातली शिवसेना असेल, अजितदारांची राष्ट्रवादी असेल, मनसेही सोबत आहे आपली रिपाई पण पीआरपी आहे अशी भव्य महायुती आहे. महायुतीला मोदी साहेबांचा इंजिन आहे. हे इंजिन देशातलं नाही जगातला सगळ्यात पावरफुल इंजिन आहे. या इंजिनला आपल्या वेगवेगळ्या घटक पक्षांचे डबे लागले आहेत. या डब्यांमध्ये सगळ्यांना बसण्याची जागा आहे. ही विकासाची गाडी आहे. सबका साथ सबका विकास म्हणत ही गाडी पुढे जात आहे. तुम्ही सुनील तटकरे यांच्या घड्याळ चिन्हांचे बटन दाबाल त्यावेळी ते मत मोदी साहेबांसाठी असेल. दुसरीकडे प्रत्येक जण सांगतो मीच इंजिन आहे. राहुल गांधी, पवार साहेब, उद्धव ठाकरे व इतर मीच इंजिन असे म्हणतात. राहुल गांधीच्या इंजिनमध्ये सोनिया गांधी यांनाच जागा असेल ते इंजिन दिल्लीला खेचतील. शरद पवार यांच्या इंजिनमध्ये सुप्रिया सुळे यांनाच जागा असेल ते इंजिन बारामती कडे खेचतील तर उध्दव ठाकरे यांच्या इंजिनमध्ये आदित्य ठाकरे बसू शकतात. ते इंजिन मुबई कडे ओढले जाणार आहे. त्यामुळे इंजिन जागेवरच बसणार आहे.
मोदींसाहेबांची विकासाची गाडी पुढे जाणार आहे. त्यामुळे सुनील तटकरे यांचा घड्याळ चिन्हांसमोरील बटण दाबून त्यांना विजयी करा" असे आवाहन देवेंद्रजी फडणवीस यांनी पेण येथील जाहीर सभेत मार्गदर्शन करताना केले.रायगड-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाचे) उमेदवार सुनिल तटकरे यांच्यासाठी महायुतीची जाहीर सभा पेण येथे पार पडली. या सभेत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्लाबोल चढविला. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, प्रवीण दरेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा उमेदवार खासदार सुनील तटकरे, आमदार रवीशेठ पाटील, शिवसेना प्रतोद तथा आमदार भरत गोगावले, आ. महेंद्र दळवी, आ. महेंद्र थोरवे, बाळासाहेब पाटील, आ. प्रशांत ठाकूर, आ. महेश बादली, माजी आमदार धैर्यशील पाटील, आ. अनिकेत तटकरे, विक्रांत पाटील, मधुकर कांबळे, सिताराम कांबळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नीलिमा पाटील, पेण माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील, गीता पालरेचा, उमाताई मुंडे, वैकुंठ पाटील, राजाभाई केणी, प्रसाद भोईर, डी बी पाटील, प्रभाकर (हरिओम) म्हात्रे, सतीश धारप, मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, संदीप ठाकूर, राष्ट्रवादी पेण शहराध्यक्ष जितू ठाकूर, राजेश मापारा, दयानंद भगत, अनिरुद्ध पाटील, महेश मोहिते यांच्यासह महायुतीतील नेते आणि हजारोंच्या संख्येने मतदार नागरिक उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी, "वीस कोटी लोक जे झोपडीत राहायचे त्यांना पक्क घर मिळालं, शौचालयाची व्यवस्था करून दिली, 60 कोटी लोकांच्या घरी पिण्याचे पाणी शुद्ध पाणी पोहोचवलं, 55 कोटी लोकांना पाच लाखापर्यंतचा इलाज हा आयुष्यमान भारतच्या माध्यमातून मोफत दिला, 60 कोटी तरुणांना मुद्राचं लोन बिना तारण आणि बिना गॅरेंटर्स दिलं, 31 कोटी महिला मोदीजींमुळे आपल्या पायावर उभा राहिल्या आहेत, मोदीजींनी
जवळपास 80 लाख बचत गटांना आठ लाख कोटी रुपये दिले, महिलांना आपल्या पायावर उभं केल आहे. 2026 नंतर असा मंच चालणार नाही. या मंचावरच्या अर्ध्या खुर्ध्या खाली कराव्या लागणार आणि त्या महिलांना द्यावे लागणार आहेत. कारण मोदीजींनी सांगितला आहे 2026 नंतर विधानसभेतही 33 टक्के महिला आणि लोकसभेच्या खासदारही 33% महिला होणार आहेत. त्यामुळे महिलांना खऱ्या अर्थाने अधिकार देण्याचा काम मोदीजींनी केले असल्याचे सांगितले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभेला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला.
उद्धव ठाकरेंनी आपला जाहीरनामा घोषित केला त्यांचा जाहीरनामा तर घोषित व्हायच्या आधीच जमिनीवर पडला. जाहीरनामालाही मान्य नव्हतं की त्यांच्याकडून आपण घोषित व्हावं. असा मिश्किल टोला ऊबाठा गटाच्या जाहिरनाम्या वरुन देवेंद्र फडणवीस यांनी उध्दव ठाकरे यांना मारला.
रायगड मधील बाळगंगाधरणाच्या संदर्भात बोलतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आंदोलकांना मी सांगू इच्छितो काळजी करू नका सगळे प्रश्न आम्ही या ठिकाणी सोडवतो आहोत. बाळगंगा धरण त्या ठिकाणी योग्य प्रकारे पूर्ण करण्यात येईल. येथील प्रकल्पग्रस्थांचे प्रश्न योग्य प्रकारे सोडविला जाईल. त्याच बरोबर पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न जो आहे तो योग्य प्रकारे मार्गी लावला जाईल असे आश्वासन यावेळी बाळगंगा धरण बाधितांना दिले. तसेच मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवण्याकरता सुनील तटकरे यांना निवडून द्या आणि ७ मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या वेळी घड्याळ या चिन्हा समोरील बटन दाबन्याचे आवाहन देवेंद्र फड़नवीस यांनी केले. लोकसभा रायगड रत्नागिरी मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी उपस्थितांना संबोधताना सांगितले की महायुती 400 चा
आकडा निश्चितच पार करेल असा विश्वास व्यक्त करत इंडिया
आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांचा समाचार घेतला अनंत गीते यांच्यावर टीका करताना आनंद गीते यांचे दुसरे नाव "निष्क्रिय ते
अनंत गीते" असे आहे. असा खोचक टोला तटकरे यांनी लगावला.
त्याच बरोबर देशात केंद्र सरकार आणि राज्यात राज्यसरकार यांनी
केलेल्या कामाचा आलेख तटकरे यांनी उपस्थितांसमोर ठेवला. अनंत
गीते हे मोदी सरकार मध्ये अवजड़ उद्योग खात्याचे मंत्री होते. मंत्री
असूनही त्यांना या जिल्ह्यांतील तरुणांना नोकऱ्या देता आल्या नाहीत
याच्यावरुनच गीतेची निष्क्रियता दिसून येते. निसर्ग चक्रीवादळ असेल
किंवा कोरोना सारखी महामारी असेल यावेळी अनंत गीते कुठे लपला
होतात ? या संकट काळात जेव्हा तुमची गरज या मतदारसंघाला होती
तेव्हा तुम्ही कुठे दिसला नाहीत. मात्र हा सुनील तटकरे दिवस रात्र या
मतदारसंघातील नागरिकांसोबत होता. असेही त्यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री उदय सामंत, आमदार रवीशेठ पाटील इ इतरांनी
मार्गदर्शन करताना सुनील तटकरे यांनी विजयी करण्याचे आवाहन केले.