Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

रायगडचे खासदार तटकरेच ! तालुकाध्यक्ष दयानंद भगत यांचा विश्वास .

Responsive Ad Here

✍🏻गडब/अवंतिका म्हात्रे

      रायगडसह पेण मतदार संघातील महायुतीकडून उमेदवार सुनिल तटकरे यांना बहुमतांनी विजयी करण्यासाठी सारेच कामाला लागले असून या लोकसभा निवडणुकीत ही विरोधी उमेदवाराला सुनिल तटकरे चारीमुंड्याचीत करतील, असा विश्वास पेण राष्ट्रवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष दयानंद भगत यांनी विरोधकांना इशारा देताना व्यक्त केला आहे. या वेळी त्यांच्या बरोबर शहराध्यक्ष जितेंद्र ठाकूर, माजी नगराध्यक्ष संतोष शृंगारपुरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. रायगड लोकसभा मतदार

संघात खरी टक्कर अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा खासदार तसेच महायुतीचे उमेदवार सुनिल तटकरे आणि (इंडिया) महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्यात होणार असल्याने रायगड लोकसभा निवडणुकीचे राजकारण हळुहळू चांगलेच तापायला लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते खासदार सुनिल तटकरे यांना महायुतीमधून रायगड लोकसभेची उमेदवारी मिळाल्याने राष्ट्रवादी पक्ष, तसेच युतीमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. महाड येथील युतीतील शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून खासदार सुनिल तटकरे यांच्या प्रचाराला पोलादपूर येथून जोरदार सुरुवात केली. तसेच पेण भाजपचे आमदार रविशेठ पाटील, अलिबाग शिवसेनेचे आमदार महेंद्रशेठ दळवी, कर्जत शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या बरोबरच पेणचे माजी आमदार तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा पाटील हे स्वतः उमेदवार सुनिल तटकरे यांना बहुमतांनी विजयी करण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांसह प्रचारात उतरलेले असल्याने पुन्हा रायगडाचे खासदार सुनिल तटकरेच हे बहुमतांनी विजयी होणार असल्याने, तसेच महायुतीचे उमेदवार म्हणून सुनिल तटकरे यांचे नाव ऐकताच विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू न विरोधक सैरभैर झाले आहेत. त्यामुळेच सुनिल तटकरे यांच्यावर बिनबुडाचे आरोप करण्यात येत आहे. पण त्याचे उत्तर येत्या ७ तारखेला मिळणार असल्याचे पेण तालुका राष्टवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष दयानंद भगत यांनी सांगीतले .