गडब/सुरेश म्हात्रे
⬛लोकांवर आलेल्या संकटावर मदत करावयास धावणे हे लोकप्रतिनिधींचे आद्य कर्तव्य असताना दुर्लक्ष करून हसणे म्हणजे हा लोकशाहीचा अपमान असून लोक निश्चितच गीते यांना त्यांची जागा दाखवून देतील, असा विश्वास यावेळी सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. शिवसेनेत गीते होते म्हणून गीते जिंकून आले. गीते निवडून येऊनसुद्धा जनतेची व लोकाभिमुख कामे करण्यात सपशेल अपयशी ठरल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले. भाजपची साथ होती म्हणून गीते निवडून येत होते. आता भाजप आमच्या सोबत आहे त्यामुळे विजयाची खात्री असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाला हजरोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे,शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले, भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, आमदार महेश बालदी, आमदार महेंद्र थोरवे, आमदार योगेश कदम, आमदार अनिकेत तटकरे, भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष व माजी आमदार धैर्यशील पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील आदींसह प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महायुतीच्या विराट सभेत रणशिंग फुंकले
महायुतीच्या सर्व नेत्यांच्या साक्षीने ४५+ जागा घेऊनच राज्यामध्ये महायुती जागा जिंकेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला. आज गतिमान महायुती सरकारच्या माध्यमातून जे काम होत आहे, त्यामुळे नक्कीच महायुतीला यश मिळेल, असेही तटकरे म्हणाले. रायगड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी महायुतीच्या विराट जाहीर सभेतून सुनिल तटकरे यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले. मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले की, तुमचं आमचं आणि सर्व देशातील पुढच्या पिढीत भविष्य ठरवणारी निवडणूक आहे प्रत्येक बूथवरती होणार या मतदानाचा हे महायुतीला आणि आपल्या असणारे उमेदवार शेतकऱ्यांना झाल्याशिवाय राहणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. यावेळी उपस्थित महायुतीच्या अन्य नेत्यांनीही आपापले विचार व्यक्त केले.