गडब/सुरेश म्हात्रे
रायगड लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे हे विक्रमी मतांनी विजयी होणार असल्याचा विश्वास पेण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दयानंद भगत यांनी व्यक्त केला आहे.पेण खारपाडा, जिते, बलवली, वडखळ,गडब, आमटेम आधी भागात तटकरे यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. एक संयमी, अभ्यासू व शांत स्वभावाचे नेतृत्व म्हणून त्यांची ख्याती असून महायुतीचे नेते पदाधिकारी हे गावागावात पंचायत समिती गणनिहाय दौरे करीत असून मतदारांजवळ संपर्क करीत आहेत. यावेळी मतदारांनी सुनिल तटकरे यांना निवडून देण्याचा पक्का निर्धार केल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. मोदीना पंतप्रधान व तटकरेंना केंद्रीयमंत्री करण्याचा निर्धार मतदारांनी केलेला आहे. शिवसेना नेते रामदासभाई कदम हे तटकरे साहेबांच्या प्रचारार्थ उतरल्याने व त्यांनी प्रचार सभा घेतल्याने वातावरण महायुतीमय झालेले आहे. महायुतीचे सर्व पक्ष, नेते, पदाधिकारी तनमनधनाने प्रचारासाठी उतरलेले आहेत. त्याचा परिणाम मतदारांवर दिसून येत असून सर्व कार्यकर्ते एकत्र एकदिलाने काम करीत असत्याचे चित्र या निवडणूकीत पहावयास मिळत आहे. वाडी वस्त्यांवर शिवसेनेचे पदाधिकारी, महिलआघाडी व युवासेनेचे कार्यकर्ते बैठका घेऊन तटकरेंचा प्रचंड मतांनी विजय सुनिश्चित असल्याचे जिल्हाप्रमुख पेण तालुका अध्यक्ष दयानंद भगत यांनी सांगितले आहे.