*गडब/सुरेश म्हात्रे*
रायगड जिल्ह्यातील मतदार संख्येत वाढ होऊन ९ एप्रिल अखेरपर्यंत जिल्ह्यातील एकूण २३ लक्ष ६६ हजार ५८ मतदार नोंदणी झाली आहे. २३ जानेवारीनुसार जिल्ह्यात २३ लाख १६ हजार ५१५ मतदार होते. एकूण मतदार संख्येत जिल्ह्यात एकूण ४९ हजार ५४३ इतकी वाढ झाली आहे. यापैकी ३२ रायगड लोकसभा मतदार संघात ९ एप्रिल अखेर एकूण १६ लक्ष ६८ हजार ३७२ मतदार असून पुरुष मतदार ८ लक्ष २० हजार ६०५ महिला मतदार ८ लक्ष ४७ हजार ७६३ व तृतीयपंथी चार मतदार आहेत.
जिल्ह्यात केंद्रीय
रायगड
२३ जानेवारीनुसार मतदार संघात १६ लाख ५३ हजार ९३५ मतदार आहेत. यामध्ये पुरुष ८ लाख १३ हजार ५१, तर स्वी ८ लाख ४० हजार ४१६ आहेत. मतदार संघात पुरुष मतदारांमध्ये ७ हजार ९० तर
स्त्री मतदारांमध्ये ७ हजार ३४७ वाढ झाली आहे. वयोवृद्ध ८५ वर्षावरील मतदार व दिव्यांग मतदार धरून मतदान करणार असून ३ हजार ६३ मतदारांनी यासाठी निवडणूक प्रशासनाकडे मागणी नोंदवली आहे.
राखीव पोलिस दलाच्या तीन कंपनी नियुक्त करण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक कंपनी अलिबाग येथे दाखल झाली आहे. गुन्हेगाराविरोधात पोलिस विभागाने अजामीनपात्र, फरार, वॉन्टेड व्यक्तीविरोधात मोहीम राबवली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या २३९ पैकी २१६ व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. निवडणूक घोषित झाल्यानंतर मतदार संघात प्रतिबंधात्मक कारवाई करत १२ लाख ७५ हजार रुपये किंमतीची अवैध दारू व ६० लाख १८ हजार रुपये बेहिशेबी रोख सक्रम विविध कारवाईमध्ये जप्त करण्यात आली. - सोमनाथ घार्गे,
जिल्हा पोलिस अधीक्षक