Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

रायगड लोकसभेची निवडणुक चुरशीची होणार अनंत गीत, सुनील तटकरेंसह मतदार संघातील आमदारांचा कस लागणार!

Responsive Ad Here
गडब/सुरेश म्हात्रे

राज्यातील प्रमुख लोकसभा मतदारसंघाकडे लक्ष लागून राहिलेल्या रायगड लोक सभा लढत होण्याचे स्पष्ट संकेत प्राप्त झाले आहे. ही निवडणुक रंगतदार अवस्थेत येऊन ठेपली आहे.या निवडणुकीसाठी आत्तापर्यंत २८ उमेदवार रिंगणात असून यापैकी किती उमेदवार आपले अर्ज मागे घेतात त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असले तरी ही निवडणुक पंचरंगी होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. लोकसभेची ही निवडणूक आणखी पाच महिन्यांनी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालिम असल्यानेया मतदार संघातील विद्यमानआमदारांचाही कस लागणार आहे. राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणा नंतर होणारी ही पहिलीच निवडणुक असल्यान राज्यातील जनतेचा कल या बदललेल्या राजकिय समीकरणाकडे कसा आहे हे ही या निवडणुकीतून स्पष्ट होणार आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातील पक्षीय बळाचा विचार केला तर महायुतीची बाजु मजबूत मानली जात आहे. सहा विधानसभा क्षेत्रापैकी गुहागर वगळता इतर पाचही मतदार संघामध्ये महायुतीची सत्ता आहे. मात्र शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीनंतर मतदार संघातील किती मतदार सत्ताधारी आमदारांसोबत आहेत व किती मतदार उबाठा व शरद पवार गटा सोबत आहेत हेही या निवडणुकीत ठरणार आहे.
मुख्य उमेदवारांच्या नावाशी सार्धम्य असलेल्या अनंत गीते यांच्या नावाचे दोन तर सुनिल तटकरी नावाचे एक उमेदवार रिंगणात आहेत. असाप्रयोग गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत करण्यात आला होता. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सुनिल तटकरे यांच्या नावाच्या अपक्ष उमेदवाराने घेतलेल्या मतांमुळे तटकरे यांचा निसटता पराभव झाला होता. त्यामुळे या निवडणुकीतही अपक्ष असणारे उमेदवार किती मते घेणार यावर मुख्य उमेदवारांचा जय पराजय ठरण्याची येत नाही. रायगड लोकसभा मतदार संघात अनंत गीते विरुद्ध सुनील तटकरे अशी लढत होत असली तरी गीते यांनी यापूर्वी व प्रचारादरम्यान शिवसेना नेते रामदास कदम, आ. भरतशेठ गोगावले यांना दुखावल्याने हे दोघे गीते यांना पराभुत करण्यासाठी रायगड रत्नागिरी जिल्ह्यात आपली सर्व ताकद पणाला लावणार असल्याने या मतदार संघातून तटकरे यांना मिळणारे मताधिक्याची भरपाई गीते यांना अन्य मतदार संघातून करावी लागणार आहे. गीते हे गतवर्षीच्या निवडणुकीत विजय होऊन त्या मतदारसंघात फिरकलेही नाहीत सदर मतदार संघात कोणतेही काम केलेले दिसून येत नाहीत त्यामुळे आनंद गीते निवडून येण्याची शक्यता नाही.