गडब/सुरेश म्हात्रे
⬛रायगड जिल्ह्यातील पेण शहरापासून अवध्या आठ कि मी अंतरावर बसलेल गडब येथील श्री काळबादेवीचे मंदिर आहे उंच टेकडीवर गडब पेपील श्री काळबादेवीचे मंदीर निसर्गरम्य सानिध्य लाभलेल्या डोंगर माध्यावर आहे सर्वांच्या श्रद्धेचे हे मंदीर ७५ किलो मिटर अंतरावर आहे सर्व भक्तांचे श्रद्धास्थान असनाऱ्या नवसाला पावणाऱ्या व भवताच्या हाकेला धावणाऱ्या गडब येथिल श्री काळबादवीची महती फार मोठी आहे. नवसाला पावणाऱ्या ग्रामदेवता काळंबा देवीचे आकर्षक मंदिर गावाच्या उत्तरेला २०० मीटर अंतरावर असलेल्या गावाच्या टेकडीवर वसलेले आहे. मंदिरासमोर भव्य जसे सभागृह आहे पुढे भव्य पटांगण आहे व मंदिराच्या सभोवताली दाट हिरवळ
पसरली आहे सदर मंदिराचे नुकताच नाविण्यपुर्ण काम करण्यात आले आहे. या कामात गावातील पंच मंडळी काळंबा देवी
मंडळाचे अध्यक्ष तुकाराम म्हात्रे, धाया पांडू म्हात्रे, प्रकाश
लक्ष्मण म्हात्रे, जनार्दन जांभुळकर, सुर्यकात, पाटील, नारायण
म्हात्रे, मोरेश्वर म्हात्रे, आत्माराम म्हात्रे, वसंत म्हात्रे, किरण म्हात्रे,
आदींनी विशेष मेहनत घेऊन सदर काम मार्गस्त लावले.
फार वर्षापूर्वीची आख्यायिका आहे. या परिसरात कळंब
नावाच्या राक्षसाने चुमाकूळ घातला होता त्यावेळी देवीने त्या
राक्षसाचा वध केला व या ठिकाणी अवतीर्ण झाली या
अख्यापिके बरोबरच अशीही आख्यायिका आहे की, शिवाजी महाराजांच्या काळात कल्याणची लूट केली गेली त्याचबरोबर कल्याण च्या सुभेदाराची लावण्यवती व रूपवती सुनेला शिवरायांकडून बक्षीस मिळविण्याच्या उद्देशाने त्यांच्या काही सरदारांनी त्या खजिन्याबरोबर दरबारात आणले परंतु शिवरायानी तिला आपल्या आईची उपमा देऊन भारतीय संस्कृती व संस्कार यांना साधेचे उत्तर देऊन खणा नारळाने ओटी भरून ज्यांनी तिला मेन्यातून आणली होती. त्याना तिला कल्याण च्या सुभेदाराकडे परत नेण्याचा आदेश दिला सुभेदाराच्या सुनेला घेऊन आणारे सैनिक गडब येथिल काळंबा देवीच्या देवळाच्या परिसरातून जात असताना थोडा वेळ विश्रांतीसाठी थांबले व नंतर पुन्हा मेना घेऊन कल्याणच्या दिशेने निघाले असताना त्या मेन्यात सुभेदाराची सून नसल्याचे निदर्शनात आले सैनिक रिकामा मेना घेऊन माघारी फिरले त्या
मेन्यातील सुंदर सखी म्हणजे गडब गावची ग्रामदेवता
काळबादेवी होती असे मानतातवाजत गाजत देवळात नेली जाते नवरात्रीचे नऊ दिवस गावातील तसेच बाहेरील भक्तगण श्री काळबादेवीच्या मंदिरात दर्शनासाठी येत असतात नवरात्रीच्या उत्सवात नवस फेडण्यासाठी परिसरातील तसेच मुंबई ठाणे रत्नागीरी इत्यादी ठिकाणचे भाविक येत असतात. देवीच्या वास्तव्याचा व संकट कालीन दर्शनाचा अनुभव कित्येक लोकांना असल्यामुळे प्रत्येक वर्षी भक्तगणांमध्ये वाढ होत आहे नवरात्रीमध्ये दररोज रात्री बारा वाजता देवीची आरती केली जाते त्याचबरोबर सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते दर मंगळवारी सायंकाळी देवीची आरती केली जाते यंदाही ही नवरात्र उत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाची रेलचेल होत आहे. स्थासाठी ग्रामस्थ मंडळी कसोशीने प्रयत्न करित आहेत.