Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

Responsive Ad Here
नात्यात राजकारण- दीर-भावजयीची वेगवेगळी भूमिका
गडब/ सुरेश म्हात्रे 

बारामतीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या नणंद- भावजयीत लोकसभेच्या निवडणुकीत जोरदार लढत बघायला मिळणार आहे. तर तसाच काहीसा प्रकार राजकीय महत्वकांक्षा वाढलेल्या मेटे कुटुंबातही होण्याची शक्यता असून शिवसंग्राम पक्षाचे विनायक मेटे यांच्या कुटुंबातही फाटाफूट होण्याची शक्यता आहे. 
विनायक मेटे यांची पत्नी ज्योती मेटे विरुद्ध त्यांचा दीर तथा विनायक मेटे यांचा भाऊ असा सामना रंगणार आहे. आता शिवसंग्राम पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष ज्योती मेटे यांची राष्ट्रवादी काँग्रेससोबत बोलणी सुरू असताना, दुसरीकडे विनायक मेटे यांच्या लहान भावाची संघटना महायुतीत सहभागी होण्याची शक्यता आहे. रामहरी मेटे यांच्याकडून जय शिवसंग्राम नावाची संघटना स्थापन करण्यात आली. आता एकजण महाविकास आघाडीसोबत आणि दुसरे महायुतीसोबत जाण्याची शक्यता आहे.
*बीडमध्ये मेटे विरुद्ध मेटे वाद*
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन-तीन दिवसात जय शिवसंग्राम ही संघटना महायुतीमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांचादेखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सहभागासंदर्भातला निर्णय ४८ तासांत होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास बीड जिल्ह्यात मेटे विरुद्ध मेटे असाही वाद पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
*मुंडे विरुद्ध मुंडे वाद मिटला*
धनंजय मुंडे- पंकजा मुंडे या सामना गेली अनेक वर्ष बीडच्या नागरिकांसह संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा यांनी धनंजय मुंडे यांचा पराभव केला होता. तर, २०१९मध्ये धनंजय मुंडे यांनी पंकजा यांचा पराभव केला होता. या काळात मुंडे कुटुंबीयांमध्ये वाद रंगल्याचे राज्याने पाहिले. आता मुंडे बहिण-भावात समेट घडला असून मेटेंच्या घरात वाद सुरु झाले आहेत. *बारामतीत नणंद विरुद्ध भावजय लढत*
सुप्रिया सुळे बारामतीतून तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. अजित पवार महायुती आल्यापासून लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून उमेदवार देणार असल्याची चर्चा होती. गेल्या काही महिन्यांपासून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या लढणार हे स्पष्ट झाले होते. मात्र, आता नणंद सुप्रिया सुळे विरुद्ध वहिनी सुनेत्रा पवार अशी थेट लढत रंगणार आहे. राज्यासह देशातील जनतेचे या लढतीकडे लक्ष लागले आहे.