गडब/सुरेश म्हात्रे
⬛ जेएसडब्ल्यू कंपनीच्या विस्तारित प्रकल्पासाठी महावितरणच्या कानसई सबस्टेशनमधून विद्युत पुरवठा केला जाणार आहे. यासाठी नागोठणे विभागातील पळस व परिसरातील गावांतील शेतकऱ्यांना विश्वासात घेताच कंपनीने त्यांच्या शेतजमिनीमधून उच्चदाबाची विद्युतवाहिनी नेण्यासाठी परस्पर सर्व्हेक्षण केले आहे. कंपनीच्या या मनमानी कारभाराविरोधात शेतकरी आक्रमक झाले असून, शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी किशन जावळे यांना निवेदन देत कंपनीच्या कारभाराला विरोध दर्शविला आहे.
शिर्के यांनी निवेदन स्वीकारले असून याप्रकरणी योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले.
यावेळी स्थानिक शेतकरी चंद्रकांत दुर्गावले, ज्ञानेश्वर शिर्के, शशिकांत शिर्के, अजित शिर्के, विजय विचारे, लक्ष्मण भालेकर, शेत पळगावचे ग्रामपंचायत सदस्य सतीश डाकी, निडी गावचे हरिश्चंद्र मढवी, वाघली गावचे माजी उपसरपंच रामचंद्र आप्पा कदम, बाहेरशिव गावचे गणेश म्हात्रे उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी निवेदन स्वीकारले असून याप्रकरणी योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले.
यावेळी स्थानिक शेतकरी चंद्रकांत दुर्गावले, ज्ञानेश्वर शिर्के, शशिकांत शिर्के, अजित शिर्के, विजय विचारे, लक्ष्मण भालेकर, शेत पळगावचे ग्रामपंचायत सदस्य सतीश डाकी, निडी गावचे हरिश्चंद्र मढवी, वाघली गावचे माजी उपसरपंच रामचंद्र आप्पा कदम, बाहेरशिव गावचे गणेश म्हात्रे उपस्थित होते.
३० किलोमीटर अंतरातील जमिनींचे सव्र्व्हेक्षण करताना स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेतले नाही.टॉवरसाठी बाधित होणाऱ्या जागेपोटी काही शेतकऱ्यांना फसवून सहा ते सात लाख रुपयांचे धनादेश दिले आहेत. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.