Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

बापूसाहेब नेने फाउंडेशन व सोबती संघटनेचे पुरस्कार जाहीर.

Responsive Ad Here


✍🏻गडब/अवंतिका म्हात्रे*

         बापूसाहेब नेने फाउंडेशन व सोबती संघटना पेण मार्फत ज्येष्ठ समाजसेविका शुभांगी नेने यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी बापूसाहेब नेने फाउंडेशन तर्फे पाच शिक्षकांना आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार दिला जातो. तर सोबती संघटनेमार्फत विविध क्षेत्रात काम करणाऱ्या पाच मान्यवरांना देखील सोबती आदर्श व्यक्तीमत्व पुरस्कार देउन सन्मान केले जाते. यावर्षी सोबती मार्फत सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महेंद्र ठाकूर, कला क्षेत्रात काम करणारे राजा आत्रे, क्रिडा क्षेत्रात काम करणारी मयुरा म्हात्रे खअंगतर, शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे प्रकाश गुरव, धाडस विशेष पुरस्कार सर्प मित्र योगेंद्र विरकर, तर बापूसाहेब नेने फाउंडेशन तर्फे आदर्श शिक्षक म्हणून विनोद दामोदर म्हात्रे शाळा बोर्वे, महेंद्र पाटील शाळा आमटेम, प्रतिभा समेळ शाळा शिशू विकास मंदिर पेण, गजानन पाटील शाळा खारसापोली बेडी, अमित विचारे शाळा डॉ. राम हरि धोरे शिशू मंदिर खोपोली, अदिंचा समावेश आहे. हा पुरस्कार सोहळा १४ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता भाउ साहेब नेने महाविद्यालयाच्या सांस्कृतिक ओपन हॉलमध्ये ज्येष्ठ समाजसेवक बापूसाहेब नेने व ज्येष्ठ समाजसेविका शुभांगी नेने यांच्या उपस्थितीत होणार आहे.