✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे
माणगाव कुणबी भवन येथे सोमवार, दि. १ एप्रिल रोजी महायुतीच्या दक्षिण रायगड जिल्हा पदाधिकारी यांचा मेळावा उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी सांगितले कि, मला खात्री आहे मी राष्ट्रवादीचा नव्हे तर महायुतीचा खासदार म्हणून निर्वाचित होणार. महाड, पोलादपूर, माणगावचे आ. भरत गोगावले यांनी सांगितले कि, आजपासून आपण सर्वांनी हातात हात घालून काम करून सुनील तटकरेंना राज्यात पहिल्या 10 खासदारांमध्ये निवडून आणू. पेण विधानसभा मतदार संघाचे आ. रवीशेठ पाटील यांनी सांगितले कि, देशाला मिळालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हि ईश्वरी देणगी तर भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी सांगितले कि, खा. सुनील तटकरे हे आपल्या महायुतीचे उमेदवार आहेत.
३२ रायगड-रत्नागिरी लोकसभा मतदार संघाची निवडणूक
नुकतीच जाहीर झाली असून या निवडणुकीसाठी दि. ७ मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकी संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, आरपीआय महायुतीचे
उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ श्रीवर्धन व महाड विधानसभा मतदार संघातील महायुतीच्या दक्षिण रायगड जिल्हा पदाधिकारी यांचा मेळावा कुणबी भवन माणगाव येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे, आ. भरत गोगावले, भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. तसेच यावेळी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, आ. रवीशेठ पाटील, आ. अनिकेत तटकरे, भाजपचे ज्येष्ठ नेते
सतीश धारप, शिवसेना नेते अॅड. राजीव साबळे, शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण चाळके, जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर,
अॅड. महेश मोहिते, चंद्रकांत कळंबे, बिपीन म्हामुणकर, युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे, भाजपच्या प्रदेश महिला मोर्चा सचिव यशोधरा गोडबोले, मुक्तार वेळासकर,
नाझीम हासवारे, महादेव बक्कम, सुभाष केकाणे, आनंद यादव, राजेंद्र शिर्के, श्वेता देशमुख, नीलिमा घोसाळकर,योगिता चव्हाण, नितीन दसवंते, शादाब गैबी, संदीप खरंगटे, दिलीप जाधव, नितीन वाढवळ, अरुणा शेट, संगीता बक्कम, तुकाराम केसरकर, दीपक जाधव, बाबूशेठ खानविलकर, हुसेन रहाटविलकर, संजय मपारा, निलेश
थोरे, काका नवगणे, उदय अधिकारी, नितीन घोणे, शर्मिला
सुर्वे, ममता थोरे, सचिन बोंबले, नगरसेवक, नगरसेविका,
विविध तालुक्यांचे तालुकाप्रमुख, तालुका अध्यक्ष,विभागप्रमुख, महिला पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने
उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना खा. सुनील तटकरे म्हणाले कि, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एका निर्धाराने व आत्मविश्वासाने आपण जमलो आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपला देश प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. याकडे पाहत अजितदादांच्या नेतृत्वाखाली बहुजनांच्या व्यापक हितासाठी आम्ही सारी मंडळी सत्तेत सहभागी झालो. सत्तेत असल्यावर मोठ्या प्रमाणात आपल्या मतदार संघातील विकास कामे करता येतात. पायाभूत सुविधा या सरकारच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत. रस्ते, रेल्वे यांचे जाळे पसरले गेले आहेत. महायुतीच्या माध्यमातून विकास हेच आपण नजरेसमोर ठेवले आहे. यापुढे येणाऱ्या प्रत्येक निवडणूक महायुतीच्या माध्यमातून आपण लढविणार असून तुमचा खासदार म्हणून मी सर्वोतोपरी सहकार्य करीन. रायगडचा खासदार म्हूतून निवडून आल्यावर तुमच्या सर्वांची मान उंचावेल असे काम करीन.
आ. भरत गोगावले आपल्या मार्गदर्शनात बोलताना म्हणाले कि, ७ मे रोजी रायगड लोकसभेची निवडणूक होणार असून ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. संपूर्ण जगाचे लक्ष या निकडणुकीकडे लागून आहे. महाड मतदार संघातून भरघोस मताधिक्य आपण सुनील तटकरेंना देणार असून राज्यातील पहिल्या १० खासदारांमध्ये तटकरे निवडूण येतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पावणे दोन वर्षात भरपूर विकास कामे आपण महाड मतदार संघात केली आहेत. देशात सत्ता आपण आणतोय पुन्हा महाराष्ट्रात सत्ता आणण्यासाठी हि लढाई आल्याला फार मोठ्या फरकाने जिंकायची आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात ४५ पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा मनोदय केला असून त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्वानी हातात हात घालून काम करणे आवश्यक आहे. पुन्हा एकदा आपल्याला देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी याना विराजमान करायचे आहे.
भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील आपल्या मार्गदर्शनात बोलताना म्हणाले कि, निवडणूक पूर्व काळ होता त्यावेळी साहजिकच प्रत्येक पक्षाला आपण पुढे
जावे असे वाटत होते. भाजप व शिवसेनेतर्फे काही नावे सुचवण्यात आली होती. ४ दिवसांपूर्वी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महायुतीची बैठक झाल्यावर त्या बैठकीत विद्यमान खासदार सुनील तटकरे
यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यावर त्यांना आपण सर्वांनी निवडून आणायचे आहे. नरेंद्र मोदी साहेब हे देशाचे पुन्हा पंतप्रधान व्हावेत यासाठी आपण सर्वांनी एक दिलाने काम करून खा. तटकरे याना निवडून आणण्याचे आवाहन केले. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते सतीश धारप म्हणाले की, सशक्त भारत, सार्वभौम भारत, विकसित भारत यासाठी आपल्याला पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचे
आहे. शिवसेनेचे युवानेते विकास गोगावले, भाजपचे अॅड.
महेश मोहिते, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त करून महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना प्रचंड मतांनी रायगडचे खासदार म्हणून निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला. या मेळाव्याचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राष्ट्रवादी काँग्रेसचेयुवानेते राजेंद्र शिर्के यांनी केले.