Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांच्या दिमतीला देवेंद्र फडणवीस मैदानात, 26 एप्रिल रोजी पेणमध्ये जाहीर सभा!

Responsive Ad Here



गडब/सुरेश म्हात्रे
राज्यातील तिसऱ्या टप्प्यात सात मे रोजी होणाऱ्या 32 रायगड लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी महायुती विरोधी महाविकास आघाडी असा जंगी सामना रायगड लोकसभा मतदारसंघात होत असून राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष व विद्यमान खासदार सुनील तटकरे यांना रायगड लोकसभा मतदारसंघात होत असलेला विरोध पाहता त्यांच्या दिमतीला खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले असून 26 एप्रिल रोजी पेणमध्ये जाहीर सभेचे आयोजन केले आहे
राज्यातील तिसऱ्या टप्प्यात 32 रायगड, 35 बारामती ,40 उस्मानाबाद, 41 लातूर 42 सोलापूर, 43 माढा ,44 सांगली ,45 सातारा, 46 रत्नागिरी- सिंधुदुर्ग 47 कोल्हापूर ,48, हातकणंगले या 11 लोकसभा मतदारसंघासाठी सात मे रोजी तिसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे.
32 रायगड लोकसभा मतदारसंघात आजी-माजी खासदारांमध्ये दुरंगी लढत होत असून या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे राष्ट्रवादी अजित पवार यांच्या दृष्टीने रायगड लोकसभा मतदारसंघाची जागा त्यांनी प्रतिष्ठेची केली असून या मतदारसंघातून यदाकदाचित तटकरेंचा पराभव झाला तर राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात बॅक फुटला जाईल अशी शंका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटांमध्ये चर्चिली जात आहे त्यामुळे तटकरेंना निवडून आणण्यासाठी भाजपाच्या सहकार्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तयारीला लागला आहे.
32 रायगड लोकसभा मतदारसंघात महाड , श्रीवर्धन ,पेण, अलिबाग ,दापोली व गुहागर. या विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो परंतु रायगड लोकसभा मतदारसंघात मुस्लिम ,कुणबी आगरी -कोळी. या समाजाच्या मतांवर विजयाचे गणित अवलंबून आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांना या सर्व समाजातील लोकांचा मोठ्या प्रमाणावर विरोध असल्याचे चित्र 32 रायगड लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात पाहण्यास मिळत आहे मात्र हे वास्तव राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व विद्यमान खासदार सुनील दत्तात्रय तटकरे यांना जरी यातील खरी गोम माहिती असली तरी नाक दाबून बुक्क्याचा मार त्यांना सहन करावा लागत असल्याचे त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या तोंडून ऐकण्यास मिळत आहे.