गडब/सुरेश म्हात्रे
⬛हाकेला धावणारी नवसाला पावणारी अशी ओळख असलेली आदर्शगाव भातसई येथिल श्री महादेवी मातेचा पालखी व यात्रा उत्सव सोमवार दि.22 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता पालखी मिरवणुकीला भातसई गावातून येशीच्या मंदिरातुन सुरुवात होणार आहे. पालखी नंतर झोलांबे कोपरे या गावात जाते. त्यानंतर पालखी झोलांबे गाव, लक्ष्मीनगर येथे फिरवून रात्री 7 वाजता आदर्शगाव भातसई गावात घरोघरी भक्तीमय वातावरणात फिरून महादेवी मंदिरात जाते.
दुसर्या दिवशी मंगळवार 23 एप्रिल रोजी महादेवी मातेचा यात्रा उत्सवाला सुरुवात होते. सकाळ पासुनभक्त नवस घेऊन मंदिरात वाजत गाजत येत आसतात. सर्व रायगड जिल्ह्यातील व बाहेरून जिल्यातील भक्ताचे जनसागर महादेवी आईच्या यात्रेमध्ये सहभागी होतात. यात्रेचा मुख्य कार्यक्रम गळ लावणे. यावर्षीचा गळ सायंकाळी 5-30वाजता सुरुवात होणार आहे. एकूण सहा भक्ताना गळ लावले जातात. त्यांपैकी एक भक्तांचा वरचा गळ लाटेला लटकवून एक फेरी फिरवली जाते. या दोन दिवशीय यात्रेत मिठाई, खेळणी, पाळणे, विविध खाद्य पदार्थांचे दुकाने असतात. या उत्सवासाठी निडी, कोपरे, झोळांबे लक्ष्मीनगर, वरवडे पाले तर्फे अष्टमी, आरे बुंद्रुक, शेजारी गावातील मानाच्या काट्या वाजतगाजत येतात. अशी माहिती येथील ग्रामस्थांनी दिली आहे. देवीचा भगत चिंतामणी सखाराम खरीवले हे आहेत. देवीचा वारा खरीवले कुटुंबातील सदस्यांच्या अंगात येत असतो. या यात्रा उत्सवासाठी भाविकांनी उपस्थित राहावे आसे आग्रहचा निमंत्रण आदर्श गाव भातसई, यात्रा उत्सव कमेटीने केली आहे.