✍️गडब / अवंतिका म्हात्रे
रायगड लोकसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष व विद्यमान खासदार हे 18 एप्रिल रोजी रायगड लोकसभा मतदारसंघातून अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
32 रायगड लोकसभा मतदारसंघातून सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर विजयी झालेले व तत्कालीन केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांना पराभवाचा झटका देणारे सुनील तटकरे यांनी शरदचंद्र पवार यांची साथ सोडून अजित पवार गटात सामील झाल्याने व यंदाच्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा त्यांची लढत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनंत गीते यांच्याशी त्यांचा सामना होणार आहे.
32 रायगड लोकसभा मतदारसंघात 18 एप्रिल रोजी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात अलिबाग येथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व विद्यमान खासदार हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील त्यांच्यासोबत शिंदे गटाचे आमदार व भाजपाचे आमदार उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे.
32 रायगड लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरण्याच्या एक दिवस अगोदर म्हणजे 17 एप्रिल रोजी भाजपा शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट व मित्र पक्षांबरोबर खासदार सुनील तटकरे हे चर्चा करणार असून या बैठकीत लोकसभा निवडणुकी संदर्भात प्रचाराची रणनीती कोणत्या पद्धतीने आखायची व व प्रचार सभा कोणकोणत्या विधानसभा मतदारसंघात व तालुक्यात घ्यायच्या आहेत व प्रचाराची रणनीती ठरविण्याबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
32 रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या घड्याळ चिन्हावर सुनिल तटकरे हे निवडणूक लढवणार आहेत तर मागील निवडणुकीत शिवसेना धनुष्यबाण चिन्हावर लढलेले माजि केंद्रीय मंत्री अनंत गीते. यांना शिवसेना पक्षातील कुटीमुळे मशाल या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे . त्यामुळे अनंत गीते यांना पुन्हा एकदा तटकरेंशी कडवी झुंज द्यावी लागणार असल्याचे संकेत सध्या तरी बघायला मिळणार आहे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर 32 रायगड लोकसभा मतदारसंघात खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात होऊन आरोप प्रत्यारोपांच्या तोफा पहावयास मिळणार आहेत.