Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

पेण ‘RTO’चं सर्व प्रकारचं कामकाज ‘या’ तारखेपासून मौजे जिते येथे होणार सुरु

Responsive Ad Here



✍️गडब / अवंतिका म्हात्रे

        उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण कार्यालयास गट नं.28/1 मौजे जिते या ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या शासकीय जागेत रस्ता सुरक्षा हॉल व कार्यालयीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून दि.23 मार्च 2024 रोजी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्याहस्ते या इमारतीचा उद्घाटन सोहाळा संपन्न झाला आहे.
   उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाची मुख्यालय जुनी इमारत विकासस्मृती व पेण-खोपोली बायपास रोड येथे सुरु असलेले कामकाज टप्प्या टप्प्याने मौजे जिते येथे हलविण्यात येणार आहे.
पेण-खोपोली बायपास रोड येथे करण्यात येणारी अनुज्ञप्ती चाचणी, नवीन वाहन नोंदणी, जुन्या वाहनांची पुर्ननोंदणी इत्यादी सर्व प्रकारचे कामकाज दि.1 एप्रिल 2024 पासून मौजे जिते येथे नवीन कार्यालयाच्या इमारतीच्या आवारात करण्यात येणार आहे. तसेच विकासस्मृती या इमारतीमध्ये सुरु असलेले कामकाज टप्प्या टप्प्याने मौजे जिते येथील नवीन इमारतीमध्ये स्थलांतरीत करण्यात येणार आहे.
सर्व वाहन मालक, चालक तसेच नागरिकांना या बदलाबाबत अवगत करण्यात येत असून उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मौजे जिते येथील नवीन इमारतीत सर्व कामकाज सुरळीत होईपर्यंत सहकार्य करावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पेण तर्फे करण्यात आले आहे.