Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

रायगडसाठी सुनील तटकरे यांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर ; अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केले जाहिर*

Responsive Ad Here

 *गडब/अवंतिका म्हात्रे*

       महायुतीच्या जागावाटपात रायगड लोकसभा मतदार संघातील तिढा अखेर सुटला आहे. भाजप, शिंदे गट या मित्र पक्षांनी दावा ठोकलेल्या या मतदार संघात अखेर कोकणचे भाग्यविधाते आणि विद्यमान खासदार सुनील तटकरे यांचीच जादू चालली आहे. मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या जागेबाबत स्पष्ठ शब्दात माहिती दिली. रायगड लोकसभा मतदार संघातून सुनील तटकरेच निवडणूक लढवतील. इतर जागांचे वाटप 28 मार्चला स्पष्ठ होईल, असे पवार म्हणाले. त्यामुळे गेले काही दिवस रायगडात चालू असलेल्या शंका-कुशंका, दावे-प्रतिदावे यांना आता पुर्णविराम मिळाला आहे. निवडणूक जाहीर व्हायच्या कित्येक महिने आधी भाजपाने लोकसभा निवडणूकीचा
रायगडातील उमेदवार म्हणूनच शेकापचे माजी
आमदार धैर्यशील पाटील यांना पक्षात घेतले
गेले, आणि त्यांना उमेदवार म्हणून समोर आणत पक्षाने शक्तीप्रदर्शनही करायला सुरूवात केली
होती. त्यामुळे रायगडातील महायुतीमध्ये कोंडी वाढली होती. या कोंडीला वाट फुटते न तोच शिंदे गटातील तिन्ही आमदारांनी खा. सुनील तटकरे यांच्याविरोधात नाराजी व्यक्त करायला सुरूवात केली होती. रायगड लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचा एकच आमदार आहे, तर आमचे तीन आमदार आहेत, त्यामुळे रायगड लोकसभेची जागा ही आम्हालाच मिळायला हवी, अशी मागणी शिंदे गटातील आमदारांकडून होवू लागली होती. यातच भर म्हणून आ. भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांचेही नाव शिंदे गटाकडून रायगड लोकसभेसाठी समोर आणले गेले. दुसरीकडे राष्ट्रवादी रायगडसाठी सुनील तटकरे यांच्याच नावावर ठाम होती. याबाबत खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच सुरूवातीपासून सुनील तटकरे हेच रायगडातून निवडणूक लढवतील असे सांगितले होते.
      महायुतीतील या गोंधळामुळे रायगडातून नेमके महायुतीतर्फे कोण लढणार..? राष्ट्रवादी आपली जागा सोडणार काय..? भाजपा याठिकाणी उमेदवार देणार की शिंदे गटाला ही जागा जाणार..? असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते.अखेर मंगळवारी या साऱ्या प्रश्नांना पुर्णविराम मिळाला.
 उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की,आमची आमदारांची बैठक झाली. आम्ही एकत्र चर्चा करुन महायुतीच्या 48 जागांबद्दल
महाराष्ट्रात कुणी कुठे जागा लढवायच्या त्याचं 80 टक्के काम झालं आहे. 99 टक्के जागावाटपाचं काम फायनल झालं आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी उमेदवार दिले आहेत. आज मी पहिली जागा जाहीर करतो आहे. रायगड लोकसभा मतदार संघातून सुनील तटकरे हे महायुतीचे उमेदवार म्हणून लोकसभा लढवतील ही माहिती अजित पवार यांनी दिली.

 ♦️ *टाईम्स स्पेशल*

 *पाच वर्षांपूर्वी निवडणुका झाल्या तेव्हा लोकसभेच्या 48 जागा होत्या. त्यावेळी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस युतीत लढले आणि महाविकास आघाडी म्हणून लढलो होतो. कारण नसताना आम्हाला तीनच जागा मिळतील वगैरे गैरसमज पसरवले गेले. 23 आणि 18 जागा भाजपा आणि शिवसेनेने 2019 ला जिंकल्या होत्या. त्यानंतर आमची चर्चा झाली आहे. अंतिम घोषणा आम्ही 28 मार्चला करणार आहोत आणि जागा जाहीर करणार आहोत. अशी माहितीही अजित पवार यांनी दिली.*