Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

♦️रेल्वे विभागाचे खोटे दस्तऐवज तयार करुनदोन भावांना पाच लाखांना फसवले आरोपींमध्ये दोन महिलांचा समावेश, वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल♦️

Responsive Ad Here


*गडब/अवंतिका म्हात्रे*
पेण तालुक्यातील काश्मिरे येथे राहणाऱ्या शेत मजुरी करणाऱ्या फिर्यादी अमृत हिरु पाटील वय ६० वर्षे यांच्या दोन मुलांना नोकरीचे आमिष दाखवून तसेच रेल्वे विभागाचे खोटया मजकुराचा बनावट दस्तऐवज तयार करुन तो खरा आहे असे भासवून फिर्यादी यांच्या सूरज व सागर मुलांकडून ५ लाख ४० हजार रूपये रक्कम घेऊन लाखों रुपयांची फसवणूक केली आहे तर यातील एजेंट असलेला आरोपीत सतीष पाटील (डोलवी) याने सागर पाटील या मुलाच्या गुगल पे आकाऊंटवर १ लाख ५० हजार परत करुन उर्वरीत रोख रक्कम रुपये ३ लाख ९० हजार रुपये परत न देता तक्रारदार यांची फसवणूक असल्याने फिर्यादी यांनी वडखळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या रेल्वे विभागाचे खोटे दस्तऐवज तयार करुन लाखों रुपयांच्या फसवणूक प्रकरणात वडखळ आणि अलिबाग येथील महिलांचा मुख्य हात असल्याने त्यांच्या विरोधात ही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सहा, फौजदार सोनावळे करत आहेत.