Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

पेण तालुक्याला पाणी टंचाईच्या झळा

Responsive Ad Here
गडब/सुरेश म्हात्रे

⬛पेण तालुक्यात खासकरून खारेपाटात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाणी योजनेसाठी गेली तीन-चार वर्ष कोट्यवधी रुपये आले. ती योजना योग्य वेळी पूर्ण न झाल्याने पेण पंचायत समितीला खारेपाटासह तालुक्याची तहान भागविण्यासाठी २ कोटी १५ लाख रूपयांचा आराखडा तयार करावा लागला. यामध्ये खारेपाटासह तालुक्यातील ५४ गावांसह १८९ वाडयांसाठी फक्त ४ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. ज्या ठिकाणी १६ टँकरची आवश्यकता आहे.
त्याठिकाणी ४ टँकर पाणी पुरवठा करत आहेत. एकीकडे मुबलक पाणीसाठा असूनदेखील वितरण व्यवस्थेच्या कुचकामी नियोजनामुळे तालुक्याला पाणी टंचाईच्या
झळा सहन कराव्या लागत आहेत. पेण तालुक्यातील सरेभाग, मसद, शिर्कीचाळ नंबर १ यामधील खारेपाट विभागातील वाशी, वढाव, भाल, काळेश्री, विठ्ठलवाडी, बोझें लाखोले, बहिराम कोटक, तामशीबंदर, तुकाराम वाडी, कान्होबा या गावांसह बळवली ग्रामपंचायत हद्दीतील दर्गावाडी निगडावाडी, भेंडीवाडी येथील अनेक वाड्या-वस्त्यांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या टंचाईग्रस्त भागातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी पेण पंचायत समितीने 
पेण खारेपाट भागातील पाणीटंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी शासनाकडे आराखड्यानुसार टँकरची मागणी करण्यात आली होती. मात्र यावेळी सहा टँकर उपलब्ध झाले आहेत. त्यातील पाच टँकर सुरू असून एक टँकर नादुरूस्त आहे तर इतर अजून सहा टँकरची परवानगी मागितली आहे. प्रातांकडे प्रस्ताव पाठवला आहे. तो प्रस्ताव लवकरच मिळेल. एकूण १२ टँकरची गरज आहे. त्यामध्ये वाकुळ ग्रामपंचायतीतील खरबाचीवाडी, नाईकवाडी, डांगरवाडी या वाड्यांनीदेखील टँकरचा प्रस्ताव पंचायत समितीकडे मांडला आहे त्याचीही पूर्तता होईल तेव्हा एक टँकर जास्तीचा मागवावा लागणार आहे. आताच्या घडीला ५ टँकरनी पाणी पुरवठा करत आहोत. यावर्षीच दोन कोटी पंधरा लाखांचा आराखडा तयार असून त्यानुसार वाशी सरेभागासह बळवली हद्दीतील दर्गावाडी व इतर वाड्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे.
भाऊसाहेब पोळ, गटविकास अधिकारी पेण शासनाकडे ७ टँकरची मागणी केली होती. मात्र ६ टँकर उपलब्ध झाले असून यातील फक्त ४ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. यामध्ये २ टँकरची परवानगी अजून आली नसल्याने खारेपाटातील ५४ गावांसह १८९ वाडया वस्त्यांना मुबलक पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण होत आहे.