गडब/सुरेश म्हात्रे
संपूर्ण हिंदुस्थानचे आराध्य दैवत मानले जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथी प्रमाणे साजरी करण्यात येणारी शिवजयंती उत्सव व पालखी मिरवणूक यंदा लोकसभा निवडणुकीच्या आचार सहितेमध्ये आली आहे. त्यामुळे आचार सहितेचे नियम पाळ- नच २८ मार्च २०२४ रोजीची शिवजयंती साजरी करण्याचे आ- वाहन वडखळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी नागरिकांना केले आहे.
यावेळी हिंदू - मुस्लिम जातीय सलोखा जपण्यासाठी नेहमी प्रमाणे पुढे येऊन सर्वांना योग्य ते सहकार्य करावे जेणेकरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची दक्षता घ्यावी. श्री. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मिरवणूक साजरी होत असतांना कोणत्याही
धार्मियांची मने दुखू नये यासाठीही सहकार्य करण्याचे आवाहनही निकम यांनी केले असून, या बाबतची महत्वपूर्ण बैठक वडखळ पोलिस ठाण्यात बोलावण्यात आली होती.
या बैठकीत वडखळ शहर व तालुक्यातील सर्वधर्मीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. यावेळी वडखळ शहर व तालुक्यातील गावागावात शिवरायांची पालखी मिरवणूक कशाप्रकारे काढण्यात यावी, याबाबत तालुक्यातील व शहरातील उपस्थितांची मते विचारात घेऊन, त्यावर योग्य निर्णय घेण्यात आल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. यावेळी या बैठकीसाठी विविध क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.