Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

नागोठणे उरुस कमिटीच्या अध्यक्षपदी सादिक इलामी तर उपाध्यक्षपदी झिशान सय्यद

Responsive Ad Here
गडब/सुरेश म्हात्रे

 ⬛अनेक वर्षांपासून नागोठणे
येथील मुस्लिम समाजाच्या वतीने मोठ्या उत्साहाने उरुस आयोजित करण्यात येतो. यावेळी नागोठणे परिसरासह संपूर्ण रायगड जिल्ह्यातील नागरिक या उरुसामध्ये विविध प्रकारची वस्तू खरेदीसाठी येत असतात. शहरातील मुख्य मार्गावरील हजरत मिरा मुहिद्दीन सरकार चौकातील शाह हजरत मिरा मोहिद्दीन बाबा दर्याच्या परिसरात साजरा करण्यात येणाऱ्या यंदाच्या उरुस उत्सवासाठी स्थापन करण्यात आलेल्या उरुस उत्सवासाठी येथील मुस्लिम समाज बांधव होतकरू तरुण सादिक इलामी यांची अध्यक्षपदी तर झिशान सय्यद यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
 तर या कमिटीत जोहेब कुरेशी यांची सेक्रेटरी आणि जुबेर पानसरे यांची खजिनदारपदी एकमताने निवड करण्यात आली आहे.याचबरोबर जमातुल मुस्लीमीन नागोठणे समाज, नागोठणे उरुस कमिटीमध्ये गुलझार शिंदी, अकलाक पानसरे, याकूब सय्यद, इक्बाल शिंदी, काझीम पानसरे, हुसेन पठाण, समीर भिकन, अमीन मांडलेकर, सुहेल पानसरे, असिफ कडवेकर, फैय्याज पानसरे, हुसेन भिकन, अमीन पानसरे, अशपाक मुल्ला, मुझफ्फार पानसरे, पप्पू अधिकारी, इक्बाल पानसरे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.संपूर्ण रायगड जिल्ह्यात हिंदू मुस्लिम तसेच सर्वधर्म समभाव जपत एकोप्याचे दर्शन घडविणाऱ्या नागोठणे शहर व परिसरात सर्व धर्मीय लोक आपापले सण उत्सव एकमेकांच्या धार्मिक भावना जपत उत्साहात साजरा करतात. आपल्या
उत्सवासाठी उत्सव कमिटी स्थापन करतात. याचप्रमाणे दरवर्षी नव्याने उरुस उत्सवासाठी मुस्लिम समाज बांधवांची उत्सव कमिटी स्थापन करण्यात येते. यावेळी या उरुस उत्सवासाठी तरुणांना संधी देण्यात आली असून अनेक वर्षांपासून सुरू असलेला उरुस याही वर्षी कोणताही गालबोट लागू न देता ही तरुण मंडळी मोठ्या उत्साहात येत्या एप्रिलमध्ये दि. २६ व २७ रोजी साजरा होणार असल्याचे आपल्या निवडी नंतर अध्यक्ष सादिक इलामी यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्यांनी सांगितले.